Shinde Group News : शिंदे गटातील धूसफूस वाढली : सत्तारांनी माझ्याशी बोलायला हवे होते; वरिष्ठ मंत्र्याने सुनावले

काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही, हे आपण आपल्या घरात म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बसून बोललं पाहिजे.
Abdul Sattar : Sandipan Bhumare
Abdul Sattar : Sandipan BhumareSarkarnama

औरंगाबाद : हिवाळी अधिवेशनात नागपुरात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर गंभीर आरोप झाले. गायरान जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांचा राजीनामाही मागण्यात आला. त्यावर बोलताना सत्तार यांनी शिंदे गटातील नेतेच आपल्याविरोधात कारस्थान रचत आहेत, असा आरोप केला हेाता. त्यानंतर शिंदे गटातील (Eknath shinde) धूसफूस वाढली आहे. सत्तार यांच्या आरोपांवर औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumare) यांनी सत्तार यांना सुनावले आहे. सत्तार यांनी माध्यमांकडे बोलण्याऐवजी पालकमंत्री म्हणून माझ्यासमोर म्हणणं मांडायला हवं होतं, असे खडे बोल भूमरे यांनी सुनावले. (Abdul Sattar should have spoken to me : Sandipan Bhumare)

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षेनते अजित पवार यांनी विधानसभेत केला होता. तसेच, सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवासाठी वसुली सुरू असल्याचे सांगितले होते. गायरान जमीन गैरव्यवहारप्रकरणी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती.

Abdul Sattar : Sandipan Bhumare
NCP News : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षावर जिवघेणा हल्ला; प्रकृती चिंताजनक

विधानसभेतील आरोपांवर बोलताना सत्तार यांनी आपल्या विरोधात शिंदे गटातील इतर नेतेच कट कारस्थान करत असल्याचा आरोप केला हेाता. मंत्रिपन मिळालेले दुसरे नेते असा त्यांनी उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांचा रोख कुणाकडे असा सवाल औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रभर चर्चिला जात आहे. याशिवाय अजित पवार यांचा राग माझ्यावर फार पूर्वीपासूनच आहे. मी त्यांची ऑफर नाकारली होती, तेव्हापासून ते माझ्यावर रागावलेले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Abdul Sattar : Sandipan Bhumare
Jyoti Mete-Fadnavis : ज्योती मेटे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? फडणवीसांनी दिले हे उत्तर....

दरम्यान, सत्तार यांच्या आरोपानंतर शिंदे गटातच धूसफूस वाढली आहे. सत्तार यांनी आरोप केलेले दुसरे नेते कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. दुसरीकडे औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनीही सत्तार यांना चांगलेच सुनावले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी चर्चा झालेल्या बातम्या बाहेर पसरविल्या जात आहेत. मात्र, अशा बातम्या बाहेर येऊ नयेत, अशा मताचा मी आहे. काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही, हे आपण आपल्या घरात म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बसून बोललं पाहिजे. पालकमंत्री म्हणून माझ्याकडं बोलायला पाहिजे होतं. माध्यमांकडे कोणीही बोलू नये, अशी माझी सूचना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in