Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी प्रथमच सांगितले ‘त्या’ हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याचे कारण....

विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. पण एका ३२ वर्षाच्या युवकाला हे खोके सरकार घाबरले आहे.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama

मुंबई : दिशा सॅलियान (Disha Salian) हिचा ज्या दिवशी मृत्यू झाला, त्याच दिवशी माझ्या आजोबांचे निधन झाले होते. आजोबांचे निधन झाल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यामुळे त्यांना जे काढायचे ते काढू द्या, असे म्हणत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रथमच त्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित असण्याबाबत प्रथमच भाष्य केले आहे. (Aaditya Thackeray for the first time said the reason for being in 'that' hospital....)

दिशा सॅलियान हिच्या मृत्यूप्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव वारंवार घेतले जात आहे. विशेषतः राणे कुटुंबीयांंकडून त्यांच्यावर यावरून वारंवार निशाणा साधण्यात येत होता. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत याबाबतचे भाष्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यावरून गेली दोन दिवसांपासून गदारोळ माजला आहे. विधानसभेत गुरुवारी त्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

Aaditya Thackeray
जयंत पाटलांच्या निलंबनाबाबत शरद पवारांचा अजितदादांना फोन

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हॉस्पीटलमध्ये उपस्थित असल्याबद्दल विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, विरोधकांना काय काढायचे ते काढू द्या. पण एका ३२ वर्षाच्या युवकाला हे खोके सरकार घाबरले आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यावर बसणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Aaditya Thackeray
मोठी बातमी : जयंत पाटील ३० डिसेंबरपर्यंत विधानसभेतून निलंबित : विधानसभा अध्यक्षांना अपशब्द उच्चारणे भोवले

मुख्यमंत्र्यांचा भूखंड गैरव्यवहार झाकण्यासाठीची एसआयटीची घोषणा, जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करणारे राज्यपाल यांच्याविरोधात बोलत राहणार आहोत. तसेच, मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा, कर्नाटककडून होणारा अन्याय याबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com