Bazar Samati Election : जुन्नरमध्ये महाआघाडीत बिघाडी : काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र; ठाकरे गट भाजप-शिंदे गटासोबत

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याशी आघाडी करण्यासाठी आमदार अतुल बेनके अनुकूल होते. मात्र, जागा वाटपात एकमत झाले नाही.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

नारायणगाव (जि. पुणे) : जुन्नर (Junnar) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar samiti) निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत शिवनेर सहकार पॅनेल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्यात दुरंगी लढत होणार असल्याचे आज निष्पन्न झाले. जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाली असून शिवसेना ठाकरे गटाने भाजप, शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. (A split in Mahavikas Aghadi in Junnar Bazar Samiti elections)

शिवनेर सहकार पॅनलची उमेदवारी यादी आमदार अतुल बेनके यांनी जाहीर केली. या वेळी विघ्नहर साखर काखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी सभापती संजय काळे उपस्थित होते. शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलची उमेदवारी यादी माजी सभापती रघुनाथ लेंडे यांनी जाहीर केली.

Mahavikas Aghadi
Ambegaon News : मोठी बातमी : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकमांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली; निकम लढण्यावर ठाम

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज अंतिम मुदत होती. ता. ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून लगेच सायंकाळी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रचारासाठी पुढील आठ दिवस मिळणार असल्याने राजकिय घडामोडींना वेग आला आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्याशी आघाडी करण्यासाठी आमदार अतुल बेनके अनुकूल होते. मात्र, जागा वाटपात एकमत न झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन शिवनेर सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Mahavikas Aghadi
Bazar Samiti Election : इंदापुरात आप्पासाहेब जगदाळे-दत्तात्रेय भरणेंची पुन्हा युती : चौघे बिनविरोध; १४ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात

शिवनेर सहकारी पॅनेलला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, भाजपच्या आशा बुचके, शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना(उद्धव ठाकरे) तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल तयार करण्यात आला आहे.

शिवनेर सहकार पॅनेलचे उमेदवार :

विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गट

● सर्वसाधारण गट : संजय काळे, निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे, तुळशीराम भोईर, संदीप शिंदे,पांडुरंग गाडगे, नबाजी घाडगे

●महिला राखीव गट : आरती वारुळे ,विमल तळपे

●इतर मागासवर्ग गट : तुषार थोरात

●भटक्या विमुक्त जाती जमाती गट : धोंडीभाऊ पिंगट

ग्रामपंचायत मतदार संघ:-

● सर्वसाधारण गट : प्रीतम काळे , सचिन उंडे,

●अनुसूचित जाती जमाती गट : गोविंद साबळे

●आर्थिक दुर्बल गट : अमोल चव्हाण

व्यापारी अडते मतदार संघ गट : सारंग घोलप, धनेश संचेती

हमाल तोलरी गट : जितेंद्र कासार

Mahavikas Aghadi
Pandharpur News : पंढरपुरात भगीरथ भालके, कल्याणराव काळे, अभिजित पाटील आले एकत्र : निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष

●शेतकरी विकास परिवर्तन पॅनल उमेदवार यादी:- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी

● सर्वसाधारण गट : ज्ञानेश्वर खंडागळे, सचिन वाळुंज, दिलीप डुंबरे, संतोष चव्हाण, नंदू पानसरे ,अशोक दरेकर ,भगवान घोलप

●महिला राखीव गट : स्वाती ढोले , सीमा तांबे .

●इतर मागासवर्ग गट : दिगंबर घोडेकर

●भटक्या विमुक्त जाती जमाती गट : सावकार पिंगट

ग्रामपंचायत मतदार संघ:-

● सर्वसाधारण गट :भास्कर गाडगे, संभाजी काळे

●अनुसूचित जाती जमाती गट : जनार्दन मरभळ

●आर्थिक दुर्बल गट : प्रियंका शेळके

व्यापारी अडते मतदार संघ गट : विश्वास डोंगरे ,जाकिर बेपारी

हमाल तोलरी गट : संकेत डुंबरे

आम्ही राष्ट्रवादीच्या नाराज गटासोबत : शिवसेना ठाकरे गट

राष्ट्रवादी काँग्रेस नाराज गट व इतरांसोबत आघडी करून माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनेल तयार करून आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com