RBI withdraw Rs 2,000 Note : भविष्यात पाचशे रुपयांची नोटदेखील बंद होऊ शकते; काय आहे कारण?

RBI Announcement : दोन हजार रुपयांची नोट साठविण्याकडे लोकांचा कल
500 Note
500 NoteSarkarnama

Demonetize of 2000 Note : करचुकवेगिरीसारख्या अर्थव्यवस्थेतील अनेक त्रूटी दुरुस्त करण्यासाठी २०१६ मध्ये नोटबंदी केली होती. त्यावेळी भारतीय चलनातील जास्त मूल्य असलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांबर बंदी घालण्यात आली. चलनातील या नोटांचे मूल्य तब्बल ८५ टक्के होते. परिणामी चलनात मोठी तूट निर्माण झाली होती.

ती तूट कमी वेळेत भरून काढण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली. त्यावेळीच ही नोट दीर्घकाळ चलनात राहणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार आता दोन हजारांची नोट चलनातून बंद करून २०१६ ची नोटबंदी पूर्ण करण्यात आली आहे.

500 Note
Jayant Patil On RBI : "दोन हजाराच्या नोटा किती छापल्या? बँकेत किती अन् व्यवहारात किती? सरकारने हिशेब द्यावा.."

चलन व्यवस्थापनासाठी कमीत कमी पाच वर्षांचा कालावधी लागतो. २०१६ नंतर आता दोन हजारांची नोटबंद केली आहे. त्यामुळे आताची नोटबंदी नैसर्गिक आहे. सध्या चलनात शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या जास्त मूल्य असलेल्या नोटा आहेत. अर्थव्यवस्थेतील त्रूटी टाळण्यासाठी कमी मूल्य असलेल्या नोटांच्या माध्यमातून व्यवहार करणे गरजेचे असते. त्यामुळे भविष्यात जास्त मूल्य असलेली पाचशे रुपायांची नोटही बंद होऊ शकते, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी केले आहे. ते शुक्रवारी (ता. १९) 'सरकारनामा लाइव्ह'मध्ये बोलत होते.  (RBI Announcement)

500 Note
RBI Withdraw 2000 RS Currency Note : दोन हजारांच्या नोटबंदी निर्णयावर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, "आरबीआयचा निर्णय.."

मालकर म्हणाले, "आता कमी मूल्य असलेल्या नोटांवरच व्यावहार होणे अपेक्षीत आहे. २०१६ मध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे मूल्य ८५ टक्के होते. त्यामुळे होणाऱ्या करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. येणाऱ्या काळात कमी मूल्य असेलेल्या नोटांवरच व्यवहार करावे लागणार आहेत. सध्या डिजीटल व्यवहार वाढत आहेत. चलन प्रवाहासाठी अधिक मूल्य असलेल्या नोट बंद करणे गरजेचे असते. त्यामुळे पाच वर्षानंतर कधीतरी चलनातून ५०० रुपयांची नोट देखील बंद करण्याचे धोरण अवलंबावे."

500 Note
RBI on 2000 Note Demonetize : दोन हजारांच्या नोटांचे भारतीय चलनात सध्या केवळ अडीच लाख कोटी रुपये !

यावेळी मालकरांनी अमेरिकेतील व्यवहाराच्या पद्धतीचा दाखला दिला. ते म्हणाले, "अमेरिकेतही १०० डॉलरची नोट आहे. मात्र ती नोट सहसा पाहायलाही मिळत नाही. कारण तेथे कॅशलेश व्यवहारावर विश्वास आहे. भारतात २०१६ मध्ये तब्बल सहा हजार कोटी मूल्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. आरबीआय या नोटा काही वर्षांपासून जमा करत आहे. सध्या भारतीय चलनात अडीच लाख मूल्य असलेल्या दोन हजारांच्या नोटा आहेत. या नोटा साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढली होती. हे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरणारे होते."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com