Daund News : तीच नदी, तेच ठिकाण; ४२ वर्षांपूर्वीही सात जणांचा झाला होता मृत्यू

सात मृतदेह आढळलेल्या पारगावमधील भीमा नदीत ४२ वर्षांपूर्वी होडी उलटून सात जणांचा मृत्यू झाला होता
Bhima river At Pargaon-Daund
Bhima river At Pargaon-DaundSarkarnama

केडगाव (जि. पुणे) : दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने पारगावलगत असलेल्या नानगावकरांना १९८१ मध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली. पुराच्या पाण्यात होडी उलटून तेव्हा सात जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारच्या घटनेने नानगाव ग्रामस्थांनाही पुन्हा ते दिवस आठवले. (42 years ago, seven people died when a boat overturned in the Bhima river At Pargaon)

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई आणि दौंड तालुक्यातील नानगाव या दोन गावांच्या मधून भीमा नदी वाहते. या ठिकाणी १९८१ च्या दरम्यान पुल नव्हता. त्यामुळे होडी हे दळणवळणाचे एकमेव साधन होते. पुणे आणि परिसरात १ जुलै १९८१ दरम्यान मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे भीमा नदीला प्रचंड मोठा पूर आला होता.

Bhima river At Pargaon-Daund
Daund Mass Murder Case : बदल्याच्या भावनेने सुडाने पेटलेल्या पाच भावंडांनी चुलत भावासह सात जणांना संपवले

वडगाव येथून २ जुलै १९८१ रोजी नानगावकडे येताना होडीत ४६ प्रवासी दाटीवाटीने बसले होते. होडी नदीच्या मध्यभागी आली असताना होडी हेलकावे खाऊन उलटली. त्यात सात प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अनेकजण पोहत नदी बाहेर पडले. होडीमधील अकरा जणांनी जवळच असलेल्या एका झाडावर रात्रभर आश्रय घेतला होता. लष्करी बचाव पथक आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाहेर काढण्यात आले.

Bhima river At Pargaon-Daund
Daund Mass Murder Case : चिमुकल्यांचे मृतदेह पाहून अग्निशमन पथकही हेलावले

ही घटना घडली तेव्हा नानगावचे ग्रामपंचायत सदस्य भगवान झंवर यांनी दौंडच्या तहसीलदारांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली होती. मुसळधार पावसात त्याकाळी दूरध्वनी चालू होता. याचेही समाधान अनेकजण व्यक्त करतात. तत्कालीन प्रांताधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेल्या श्रीमती मॅथ्यू यांनी स्वतः चिखल तुडवत शोध कार्याला दिशा दिली होती.

Bhima river At Pargaon-Daund
Daund News : दौंड हादरले; एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले

ज्या ठिकाणी १९८१ मध्ये होडी उलटली होती, त्याच परिसरात मंगळवारी पीएमआरडीएच्या पथकाला दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, तेव्हा नानगावातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना १९८१ च्या घटनेची आठवण झाली. दोन घटना वेगळ्या स्वरूपाच्या असल्या तरी मृतांचा आकडा व नदीचे ठिकाण सारखे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in