राष्ट्रवादीचे १२ नेते फुटले आहेत; फक्त प्रवेशाचा मुहूर्त बाकी आहे : शहाजी पाटलांचा गौप्यस्फोट

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी उद्याच्या नागपूर अधिवेशनानंतर सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. ते विधान अत्यंत विनोदी आहे.
Shahaji Patil
Shahaji PatilSarkarnama

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) १२ नेते फुटले आहेत; त्यांच्या प्रवेशाचा फक्त मुहूर्त बाकी आहे, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी आज केला. (12 NCP leaders split; Only admission time left : Shahaji Patil)

आमदार शहाजी पाटील हे पंढरपुरात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानाचा समाचार घेतला.

Shahaji Patil
‘आवताडेंच्या रुपाने तुम्ही १०६ वा आमदार दिला अन्‌ महाआघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला’

आमदार पाटील म्हणाले की विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी उद्याच्या नागपूर अधिवेशनानंतर राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. ते विधान अत्यंत विनोदी असे आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

Shahaji Patil
शिर्डीत शिबिर सुरू असतानाच सोलापुरात तानाजी सावंतांचा राष्ट्रवादीला दणका

गेल्या तीन महिन्यांतील शिंदे-फडणवीस या दोन नेत्यांचा कारभार बघितला तर सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात चांगल्या पद्धतीचे काम करताना दिसत आहेत. त्यांना निधी मिळत असून ते जनतेची कामे आणि प्रश्न सोडविताना ते दिसत आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात बोलणं हे एवढ्यासाठी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नेते फुटले आहेत; फक्त ज्याच्या त्याचा प्रवेशाचा मुहूर्त ठरतोय, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com