पर्यटनसाठी घेतला व्हिसा, प्रत्यक्षात केला धर्मप्रचार

परदेशी नागरिकांनी भारतात पर्यटनासाठी व्हिसा घेतला होता. मात्र ते पर्यटन करण्याऐवजी धर्मप्रचार करीत फिरले. म्हणजेच व्हिसाचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
jail
jail

नगर : जामखेड व नेवासे येथे प्रार्थनास्थळात पकडलेल्या परदेशी नागरिकांनी भारतात पर्यटनासाठी व्हिसा घेतला होता. प्रत्यक्षात त्यांनी धर्मप्रचार केला. त्यामुळे त्यांनी व्हिसाचा गैरवापर केला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. सहा दिवस पोलिस कोठडी संपल्यानंतर या विदेशी नागरिकांची आता 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
कोरोनामुळे देशभरात लाॅकडाऊन केल्यानंतर प्रशासनाने भारतात आलेल्या विदेशी नागरिकांना स्वतःहून प्रशासनाच्या ताब्यात येण्याबाबत आवाहन केले होते. मात्र अनेकजण ठिकठिकाणी लपून बसले होते. दिल्ली येथून मरकजहून आलेल्या काही नागरिकांनीही याबाबत पोलिसांना कल्पना दिली नाही. जामखेड येथील प्रार्थनास्थळात थांबलेल्या 14 जणांविरुद्ध पोलिसांनी पाच एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले. त्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले असता, त्यातील दोघे कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना चाैदा दिवस उपचार करण्यात आले. तसेच इतर दहा परदेशी नागरिकांना डाॅक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले होते. 
नेवासे येथील प्रार्थनास्थळात तपून बसलेल्या दहा जणांविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात चार एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एकजण कोरोना पाॅझिटिव्ह निघाला. अन्य लोकांना डाॅक्टरांच्या निगरानीखालील ठेवण्यात आले होते. या रुग्णाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांवर 17 एप्रिल रोजी गुन्हे दाखल करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. आता त्यांची कोठडी संपली असून, न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्यांना पारनेर येथील कारागृहात ठेवण्यात आले.

व्हिसाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न
दरम्यान, परदेशी नागरिकांनी भारतात पर्यटनासाठी व्हिसा घेतला होता. मात्र ते पर्यटन करण्याऐवजी धर्मप्रचार करीत फिरले. म्हणजेच व्हिसाचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com