Virendra sehewag warns Pakistan to improve or we will improve you | Sarkarnama

 सुधर जाओ वरना सुधार देंगे :वीरेंद्र सेहवागचा पाकला इशारा 

सरकारनामा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

पुणे : पुलवामा येथे 'सीआरपीएफ'च्या जवानांवर गुरुवारी झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यावर क्रिकेटपटूंनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पुणे : पुलवामा येथे 'सीआरपीएफ'च्या जवानांवर गुरुवारी झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यावर क्रिकेटपटूंनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

भारताचा तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्‌विटमध्ये पाकिस्तानला उद्घेशून 'सुधर जाओ वरना सुधार देंगे' असा हॅशटॅग वापरला आहे. आपल्या ट्‌विटमध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणतो, " जम्मू काश्‍मीरमध्ये आपल्या 'सीआरपीएफ'च्या शूर जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मला दुःख झाले आहे. आपले शूर जवान या हल्ल्यात हुतात्त्मा झाले आहेत. वेदना व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लवकर बरे होण्याच्या मी शुभेच्छा देतो. # सुधर जाओ वरना सुधार देंगे."

क्रिकेटपटू महंमद कैफने देखील ट्विट करून सीआरपीएफच्या जवानांवरील हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटमध्ये महंमद कैफ म्हणतो, "जवानांवर हल्ला चढविणाऱ्या भ्याड हल्लेखोरांना लवकरात लवकर धडा शिकवला जावा.''

भारतरत्न सचिन तेंडुलकर आपल्या ट्‌विटमध्ये या हल्ल्याचा उल्लेख भ्याड, व्यर्थ आणि नीच कृत्य असा केला आहे. तेंडुलकर म्हणतो, "या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या आणि आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शूर जवानांची प्रकृती लवकर सुधारो अशी मी प्रार्थना करतो. आपल्या देश सेवेविषयीच्या  निष्ठेबद्दल मी विनम्र अभिवादन करतो.''

 

भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या पुलवामा येथील घटनेने आपल्याला धक्का बसला आहे असे म्हटले आहे. आपल्या ट्‌विटमध्ये विराट म्हणतो, " देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 'सीआरपीएफ'च्या हुतात्त्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.''

 

हार्दिक पंड्याने हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगी सर्वांनी मिळून आधार दिला पाहिजे असे म्हटले आहे.

क्रिकेटपटू रोहित शर्मा, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, सुरेश रैना, शिखर धवन आदींनी ट्विट करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख