आजचा वाढदिवस : वीरेंद्र जगताप, आमदार धामणगाव रेल्वे (अमरावती) कॉंग्रेस  - virendra jagtap mla birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : वीरेंद्र जगताप, आमदार धामणगाव रेल्वे (अमरावती) कॉंग्रेस 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

आमदार वीरेंद्र जगताप धामणगाव रेल्वे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 2004 मध्ये चांदुर रेल्वे मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. अमरावती जिल्हा कॉंग्रेस समितीचे (ग्रामीण) अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना (ईजीएस) कमिटीचेही ते अध्यक्ष होते. राजकारणात येण्यापूर्वी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर विद्यापीठात त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. ते वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले.

आमदार वीरेंद्र जगताप धामणगाव रेल्वे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. 2004 मध्ये चांदुर रेल्वे मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली. अमरावती जिल्हा कॉंग्रेस समितीचे (ग्रामीण) अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या रोजगार हमी योजना (ईजीएस) कमिटीचेही ते अध्यक्ष होते. राजकारणात येण्यापूर्वी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नागपूर विद्यापीठात त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा मोर्चा काढला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युवक कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. ते वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष, महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले. चांदूर रेल्वे मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे 1995, 1999 ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली. पण त्यांना विजय मिळाला नाही. 2004, 2009 च्या निवडणुकीत त्यांनी सीमारेषित धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही त्यांनी आपली जागा कायम ठेवली. जिल्हा परिषदेमध्ये त्यांची त्यांची सत्ता आहे. अमरावती जिल्ह्यातील सिंचन व अनुशेषाचे प्रश्न मांडण्यात ते नेहमीच पुढाकार घेत असतात. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राजकारणावर आमदार जगताप यांनी ठसा उमटविला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख