viplub deb meet mohan bhagawat in nagpur | Sarkarnama

"राजधर्म पाळा' सरसंघचालकांचे त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

नागपूर ः राज्य कारभार करताना राजधर्माचे पालन करा, असे निर्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांना दिले. 

नागपूर ः राज्य कारभार करताना राजधर्माचे पालन करा, असे निर्देश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक डॉ. मोहन भागवत यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांना दिले. 

विप्लव देव यांचे सोमवारी रात्री नागपुरात आगमन झाले. आज सकाळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची महाल भागातील संघाच्या मुख्यालयात भेट घेतली. यानंतर त्यांनी "दीक्षाभूमी'लाही अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागपूर पवित्र भूमी असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून आपण त्यांची भेट घेतली. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ही त्यांच्याशी झालेली पहिलीच भेट होती. 

यावेळी सरसंघचालकांनी ज्येष्ठ म्हणून काही सल्ले दिले. त्रिपुराला स्वयंपूर्ण व विकासित राज्य करण्यासाठी राजधर्माचे पालन करा, असे निर्देश सरसंघचालकांनी दिल्याचे देव यांनी पत्रकारांना सांगितले. 

गेल्या 40 वर्षात त्रिपुरा हे अविकसित राज्य राहिले होते. साम्यवादी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांनी त्रिपुराची केवळ लूट केली. याराज्यात अधिक वीज उत्पादन होते. राज्यात निसर्गसंपदा आहे. तरीही हे राज्य गरीब राहिले आहे.

आता नव्याने राज्य विकासाच्या मार्गावर न्यावयाचे आहे. त्रिपुरातील क्विन पायनापल या फळाची निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एक सकारात्मक बदल त्रिपुरामध्ये होत असल्याचा दावा त्यांनी केला. 

त्रिपुरामध्ये घुसखोरांची समस्या नसल्याचा दावा करून विप्लव देव म्हणाले, त्रिपुरातील 98 टक्के लोकांना आधार कार्ड मिळालेले आहे. उरलेल्या लोकांना लवकरच आधार कार्ड देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आसाममध्ये असलेल्या घुसखोराची समस्या सध्या तरी त्रिपुरामध्ये नसल्याचा दावा त्यांनी केला. दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्‍वस्त विलास गजघाटे यांनी तुळशीचे रोपटे देऊन मुख्यमंत्री विप्लव देव यांचे स्वागत केले. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख