पुढच्या 'टर्म'मध्येही तावडे सांस्कृतिक मंत्रीच राहणार?

लता दिदींच्या 100 व्या वाढदिवसाला सांस्कृतीक मंत्री म्हणून विनोद तावडे येतीलच पण मुख्यमंत्री मलाही बोलवा असा कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मारली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90 जन्मदिना निमीत्त आज मुंबईत 'लता'या पुस्तकाचे पुर्नप्रकाशन झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. थोडक्यात या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा भाजपची सत्ता आलीच तर तावडेंना किरकोळ खात्यावरच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
Devendra Fadanavis - Vinod Tawade
Devendra Fadanavis - Vinod Tawade

मुंबई : लता दिदींच्या 100 व्या वाढदिवसाला सांस्कृतीक मंत्री म्हणून विनोद तावडे येतीलच पण मुख्यमंत्री मलाही बोलवा असा कोपरखळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मारली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90 जन्मदिना निमीत्त आज मुंबईत 'लता'या पुस्तकाचे पुर्नप्रकाशन झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. थोडक्यात या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा भाजपची सत्ता आलीच तर तावडेंना किरकोळ खात्यावरच समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

विनोद तावडे हे भाजपचा मराठा चेहरा म्हणुन मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात होते. मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली. त्यानंतर तावडे यांनी मुख्यमंत्री पद न मिळाल्याबद्दल फारशी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र,वारंवार नाराजी व्यक्त करणारे एकनाथ खडसे मंत्रीपदापासूनही लांब गेले. तर, तावडे यांच्या मराठा चेहऱ्याला शह देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीने बळ दिले. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे ते जुने सोबती आहेत. त्यामुळे भाजपचा मराठा चेहरा असलेले तावडे कोकणातील चेहरा म्हणून मर्यादित झाले. 

त्यातच,त्यांच्याकडील शिक्षण मंत्रालयाचा भार काढून तो मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आला.सध्या उच्च शिक्षण आणि सांस्कृतीक मंत्रालय तावडे यांच्याकडे आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेत आणि राज्याच्या राजकरणातही तावहे हे शेलारांना जेष्ट आहेत.तावडेचे एक मंत्रीपद काढून ते शेलारांना देणे म्हणजे तावडेचे पंख छाटण्याचाच प्रकार होता.

अमित शहा आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे संकेत दिले आहेत. पण,देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे त्या पुढील पाच वर्षांसाठीही दावा केला आहे. त्यांनी स्वत:च्या खुर्चीवरच दावा करताना तावडे यांना स्पर्धेतूनही बाजूला केले आहे. तावडे पुढील दहा वर्ष सांस्कृतीक मंत्री राहतील, असे सांगून या निवडणुकीनंतर सत्ता आली तरी तावडे यांना दुसरे मंत्रीपद मिळणे अवघड असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com