vinod tawade will be remove from cabinet | Sarkarnama

मंत्रीमंडळ विस्तारात विनोद तावडेंना डच्चू ? 

उमेश घोंगडे 
बुधवार, 12 जून 2019

पुणे : राज्य मंत्रीमंडळ विस्तारात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण विभाग बदलून त्यांच्याकडे अन्य खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. खात्यातील बदलासह मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद दिले जाण्याची शक्‍यतादेखील वर्तविण्यात येत आहे. 

शालेय शिक्षण विभाग संवेदनशील आहे. विभागातील छोट्या-मोठ्या निर्णयांची मोठी चर्चा होते. अनेक निर्णय राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरवर परिणाम करणारे ठरतात. त्यामुळे या निर्णयांची चर्चा होत असते. तावडे यांनी शिक्षण विभागातील विविध कामांसाठी त्यांच्या मर्जीतील लोकांची नेमणूक केल्याची चर्चा नेहमीच होत असते. या विशेष कार्यआधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेबाबत यापूर्वी काही वाददेखील झाले आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावरील (बालभारती) या विशेष कार्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाची जोरदार चर्चा सध्या शिक्षण क्षेत्रात आहे. 

कल चाचणीसह घेण्यात येणारी शिक्षण विभागातील कंत्राटे विशिष्ट लोकांनाच कशी मिळतात याचीही चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या साऱ्या घडामोडींची माहिती पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वापर्यंत पोचल्याने तावडे यांचे खाते बदलण्यात येईल किंवा त्यांना थेट मंत्रीमंडळातून वगळून प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात येईल, अशी चर्चा आहे. या साऱ्या बाबी अद्याप चर्चेच्या पातळीवरच असल्या तरी येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाच्या होणाऱ्या संभाव्य विस्तारातून सर्व काही स्पष्ट होणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख