vinod tawade play imp role in maratha reservation | Sarkarnama

चंद्रकांतदादा वादग्रस्त ठरल्याने विनोद तावडेंना पुढे चाल 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे: मराठा आंदोलनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील वादग्रस्त ठरल्याने राज्य सरकारच्यावतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा चेहरा नव्याने पुढे आणण्यात आला आहे. 

पुणे: मराठा आंदोलनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील वादग्रस्त ठरल्याने राज्य सरकारच्यावतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा चेहरा नव्याने पुढे आणण्यात आला आहे. 

फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद विनोद तावडे यांना देण्यात आले होते. मात्र हळूहळू विषय तावडेंकडून चंद्रकांत पाटलांकडे सरकला. तावडे याविषयावर काम करत होते, मात्र ते पुढे येत नव्हते. गेले पंधरा दिवस महाराष्ट्रात आगडोंब उसळला असताना तावडे गप्प होते. चंद्रकांत पाटील भूमिका मांडत होते, मात्र त्यांच्या मांडणीवरुन वादंग झाले. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. ते मराठा समाजाबरोबर संवाद करु शकतील, अशी परिस्थिती राहिलेली नाही. 

यापार्श्‍वभूमीवर आज मुंबईत आरक्षणासंबंधी विचारवंत, प्रतिष्ठितांची बैठक झाली. त्यानंतर यासंबंधाची माहिती देताना विनोद तावडे पुढे होते. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्र्यांबरोबर तावडे हे आघाडीवर राहतील, असे संकेत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख