vinod tawade bukkafek | Sarkarnama

विनोद तावडेंवर साताऱ्यात "बुक्‍का फेक' ! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

शिक्षणमंत्री विनोद तावडे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी येथे आले असतानाच एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर बुक्‍का टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. 

सातारा : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी येथे आले असतानाच एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर बुक्‍का टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या कार्यकर्त्यांला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. 

तावड़े यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर "विनोद तावड़े मुर्दाबाद' अशी घोषणा देत त्यांच्यावर बुक्का टाकन्याचा प्रयत्न मारुती जानकर या मल्हार क्रांतीच्या कार्यकर्त्याने केला. त्याला नगरसेवक धनंजय जांभळे आणि विठ्ठल बलशेटवार यांनी मारहाण केली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख