प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उरले फक्त नांदेडपुरतेच - विनोद तावडे

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उरले फक्त नांदेडपुरतेच - विनोद तावडे

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत लोकसभा निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे माहित असल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना ही निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती. पण हायकमांडने त्यांचे ऐकले नाही. आता तर कॉंग्रेसचे हे प्रदेशाध्यक्ष नांदेडपुरतेच मर्यादित राहिले आहेत. राज्यात ते कोठेच दिसत नाहीत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. लातूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्डात शुक्रवारी (ता.12 ) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसने पक्ष एकत्रित केले आहेत. हे सर्व पक्ष 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टिकणार नाहीत. या निवडणुकीत कॉंग्रेसचे अब तक छप्पन होईल, अशी टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तर बोलतात एक अन करतात एक, राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना 72 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. ते खरे बोलत असतील तर आमदार अमित देशमुख यांनी आता या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये टाकावेत. राहूल गांधी यांनी पैसे दिल्यानंतर त्याचे 51 हजार रुपये परत करण्यात येतील, अशी उपरोधिक टीकाही तावडे यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com