Vinayak Raut Taunts Rane's Swabhiman Party | Sarkarnama

स्वाभिमानला वाटायच आम्ही साठ हजार मतांनी जिंकू, शेवटी एक हजारावर आले पण ... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 जून 2019

 यापुढे राजकारणातच नव्हे तर समाजकारण, सहकार अशा सर्वच क्षेत्रात महायुतीच असणार आहे. या सर्व क्षेत्रातील निर्भेळ वृत्ती महाराष्ट्रात कुठेही नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.

दोडामार्ग :  यापुढे राजकारणातच नव्हे तर समाजकारण, सहकार अशा सर्वच क्षेत्रात महायुतीच असणार आहे. या सर्व क्षेत्रातील निर्भेळ वृत्ती महाराष्ट्रात कुठेही नाही, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.

राऊत यांच्या विजयानिमित्त महालक्ष्मी सभागृहात कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "स्वाभिमानला वाटायच आम्ही साठ हजार मतांनी जिंकू, मग ते पन्नास आणि दहावर आले. शेवटी एक हजारावर आले; पण तसे जिंकता येत नाही. त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात. त्यांचा विश्‍वास संपादन करावा लागतो."

"पूर्वी त्यांच्या काळात गुंतवणूकदार यायला बघत नव्हते; पण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे जिल्ह्यात रोजगार देणारे गुंतवणूकदार येत आहेत. त्यांच्या पन्नास टक्‍क्‍यांच्या मागणीमुळे ते पळून जायचे; पण गेल्या पाच वर्षात मी अथवा श्री केसरकर यांनी सत्तेचा दुरुपयोग केला नाही; पण आता दोन्ही जिल्ह्यात काम करणारे प्रामाणिक ठेकेदार निर्माण करायचे आहेत. जे दुष्ट आहेत त्यांना ठेचून काढायचे आहेत तर सज्जनाना आधार द्यायचा आहे.'' असेही राऊत म्हणाले.

यावेळी त्यांचा शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, सुधीर दळवी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख