राणेंना शह देण्यासाठी विनायक राऊत यांना मंत्रिपद देणार ?

शिवसेनेला केंद्रात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी तीन पदे मिळण्याची शक्‍यता आहे. विनायक राऊत आणि भावना गवळी किंवा बुलडाण्याचे प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे.
Raut-Rane
Raut-Rane

अनिल देसाई,  भावना गवळी आणि जाधवही चर्चेत 

मुंबई  :  नारायण राणे यांना आणखी एक धक्का देण्यासाठी   विनायक राऊत   राऊत यांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार राऊत गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे.

लोकसभा निवडणुकीत रायगडमधून अनंत गीते पराभूत झाल्यामुळे कोकणच्या वाट्याचे मंत्रिपद राऊत यांना मिळू शकते, असे सांगण्यात आले. राऊत यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघही काबीज करता येईल, अशी खात्री शिवसेनेला वाटते.  

शिवसेनेला केंद्रात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशी तीन पदे मिळण्याची शक्‍यता आहे. विनायक राऊत आणि भावना गवळी किंवा बुलडाण्याचे प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे. अनिल देसाई यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागू शकते. लोकसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदी गजानन कीर्तिकर यांची निवड होऊ शकेल, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.  

 शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्याचे नाव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी नऊ  वाजता भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना सांगतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

मागील, म्हणजे 2014 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, वांद्रे पोटनिवडणूक; तसेच 2019 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने नारायण राणे यांना जोरदार हादरा दिला आहे. त्यांना आणखी घायाळ करण्यासाठी शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रात मंत्रिपद देणार आहे. त्यानुसार राऊत गुरुवारीच मंत्रिपदाची शपथ घेतील, असे शिवसेनेच्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

तळकोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री दीपक केसरकर आणि वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचे गड उद्‌ध्वस्त केले. राणे यांच्या विरोधात रान उठवणारे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले केसरकर यांना शिवसेनेने राज्यमंत्रिपद दिले होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com