vinayak nimhan applies for ticket | Sarkarnama

शिवसेनेतून ब्रेक घेतलेल्या निम्हणांचा पुन्हा उमेदवारीसाठी अर्ज

उमेश घोंगडे 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या पुण्यातील 23 इच्छुकांनी मुलाखत दिली. इच्छुकांमध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर व विनायक निम्हण यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली तर पुण्यातील किमान तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावेत, अशी इच्छा या इच्छुकांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत झाल्या. कोथरूड विधानसभा मतदारसंघासंदर्भाने भाजपातील इच्छुकांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेकडून कोथरूडसाठी माजी आमदार व माजी शहराध्यक्ष चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, श्याम देशपांडे व राजेंद्र धनकुडे यांनी निवडूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिवाजीनगरसाठी माजी आमदार निम्हण व आनंद मंजाळकर यांचे अर्ज आले आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाची धुरा सांभाळलेले निम्हण निवांत होते. पक्षात फारसे सक्रिय नव्हते. मात्र त्यांनी पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे. कसबा मतदारसंघातून नगरसेवक विशाल धनवडे व बाळासाहेब मालुसरे यांचे अर्ज आले आहेत. कॅन्टोन्मेन्ट मतदारसंघातून बाळासाहेब भांडे, नगरसेविका पल्लवी जावळे व अविनाश साळवे हे इच्छुक आहेत. पर्वती मतदारसंघातून अशोक हरणावळ तसेच बाळा ओसवाल यांचे अर्ज आले आहेत. खडकवासला मतदासंघातून रमेश कोंडे व कल्पना थोरवे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हडपसरमध्ये पक्षाकडे अनेकजण इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, समील तुपे, गंगाधर बधे यांचा समावेश आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून नगरसेवक संजय भोसले यांचा एकमेव अर्ज आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख