विनायक मेटेंना हवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी भारतीय जनता पक्षावरील दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. त्यांना आज पुण्यात बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावे अशी मागणी केली
Vinayak Mete Wants Leader of Opposition post in Legislative Council
Vinayak Mete Wants Leader of Opposition post in Legislative Council

पुणे : गेले अनेक वर्ष भाजपशी सूत जुळवून घेणाऱ्या शिवसंग्रामने आता मात्र भाजपला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधान परिषदेत मी ज्येष्ठ व अनुभवी आमदार असल्याने भाजपने मला विरोधी पक्षनेता केले पाहिजे. भाजपने आता तरी आमच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

भारतीय संग्राम परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी पत्रकार परिषदेत संवाद साधला. तानाजी शिंदे, आमदार डॉ. भारती लव्हेकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ महाराष्ट्र शासन उपाध्यक्ष विक्रांत आंब्रे आदी यावेळी उपस्थित होते.

विनायक मेटे म्हणाले, ''विधानपरिषदेत भाजपा विरोधीपक्षात बसल्याने विरोधी पक्षनेते पदाची निवड करावी लागणार आहे. विधान परिषदेत भाजपाचे जे मित्रपक्ष आहेत, त्यामध्ये मी ज्येष्ठ व अनुभवी सदस्य आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेते पद मला मिळाले पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना शिवसंग्रामवर अन्याय झाला. त्यामुळे आता तरी विरोधीपक्षाची संधी देऊन हा अन्याय दूर केला पाहिजे,'' 

'सारथी' विरोधातील आदेश रद्द करा

मराठा समाजाच्या विकासासाठी 'सारथी' संस्था निर्माण केली होती. पण आताचे सरकार त्याचे पंख छाटण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार मराठा समाजाच्या विरोधात नसेल तर त्यांनी हा आदेश रद्द करून अधिकाऱ्यांवर करावाई करावी. अन्यथा विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असा इशारा मेटे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com