बीडचे महायुद्ध : आता विनायक मेटे यांचे काय होणार ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असलेले शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना नकोसे झाले आहेत . लोकसभा निवडणुकीत शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये भाजपच्या विरोधात तर राज्यात सोबत अशी भूमिका घेतली होती. तेव्हापासून श्री. मेटे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे.
mete-munde-kshirsagar
mete-munde-kshirsagar

बीड : एकीकडे भाजप - शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरु झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना भाजपने कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी किंवा पाठिंबा देऊ नये असा आग्रह जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱयांनी धरला आहे .   भाजपचे जिल्ह्याचे निवडणुक निरीक्षक तथा पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे तशी तक्रार करण्यात आली आहे.

शिवसेना - भाजप यांच्यात युती झाली तर बीड विधानसभा मतदारसंघाचे करायचे काय  काय हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे . बीड शहराची जागा युतीमध्ये शिवसेनेकड़े राहिलेली होती . शिसवसेनेतर्फे निवडून आलेले सुरेश नवले यांना मंत्रीपदी शिवसेनेने दिलेले होते .  पण पुढे राष्ट्रावादी काँग्रेसचा प्रभाव येथे वाढला. 

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बीडमध्य जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीकडून निवडून आले .  २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली . तेंव्हा राष्ट्रावादीकडून जयदत्त अण्णा निवडून आले होते . भाजपतर्फे विनायक मेटेंना पुरस्कृत करण्यात आले होते . ते दुसरया क्रमांकावर राहिले होते . तर शिवसेनेचे उमेदवार अनिल जगताप तिसऱ्या  क्रमांकावर होते . 

जेथे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तेथे दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष राहिला त्याचा हक्क सेवा असा मुद्दा युतीच्या जागवतच्या चर्चेत पुढे आलेला आहे . त्या निकषावर बीडमध्ये भाजप दुसर्या क्रमांकावे राहिल्याने ही जागा भाजपला सुटावी असा युक्तिवाद होतोय . ही जागा भाजपला सुटल्यास विनायक मेटेंना पुन्हा भाजपच्या पाठिंब्यावर बीडची जागा लढविण्याची इच्छा  असल्याचे समजते . 

मात्र पंकजा मुंडे यांचा विनायक मेटे यांना त्यावर विरोध असून त्यांनी ही जागा भाजपला सुटली तर भाजपतर्फे पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांचे नाव पुढे करण्याची व्यूहरचना केलेली आहे . 

दरम्यान बीडची जागा युतीमध्ये शिवसेनेला सुटेल अशी खात्री बाळगून जयदत्त अण्णा क्षीरसागर शिवसेनेत आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले आणि शिवसेनेने त्यांना रोजगाराची हमी देत मनसबदारीही दिली . पण अलीकडे 'मातोश्री'वर  अण्णांचे वजन कमी झाल्याची चर्चा शिवसेनेतील जयदत्त अण्णांच्या विरोधकांनी सुरु केली आहे . बीडच्या जागेसाठी शिवसेना किती जोर लावते हे लवकरच कळेल . 

दरम्यान काही झाले तरी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे नको असा आग्रह मुंडे गटाकडून धरण्यात येत आहे.  लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात तर राज्यात सोबत अशी भूमिका घेत त्यांनी  राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना साथ दिली हा त्यांच्याबाबत मुख्य आक्षेप आहे . 

आता भाजप - शिवसेना युती आणि इतर घटक पक्षांच्या जागा वाटपांची चर्चा रंगत असून बीड मतदार संघातून विनायक मेटे भाजपची उमेदवारी मिळावी वा त्यांच्या पक्षाला जागा सोडावी यासाठी प्रयत्नशिल आहेत. मात्र, त्यांना उमेदवारी मागण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका जिल्हा भाजपने घेतली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यात राजकीय वितुष्ट आले होते. पुढे जिल्हा परिषद सत्तारोहणाच्या निमित्ताने त्यांच्यात झालेली राजकीय दिलजमाई काही दिवसच टिकली. पुढे मेटेंचे काही शिलेदार भाजपच्या कंपूत गेल्याने चिडलेल्या मेटेंनी लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजप विरोधी उमेदवाराचा प्रचार केला.

मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतावरुनही बीडमध्ये मोठे नाट्य घडले. त्यामुळे विनायक मेटे यांच्या उमेदवारीला भाजप नेते ताकदीने विरोधक करणार हे निश्चित होते. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून चार दिवसांपूर्वी अंबाजोगाईत आलेले भाजपचे जिल्हा निवडणुक निरीक्षक तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे विनायक मेटे यांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com