काही लोकांची नजरच चांगली नाही, त्यांना कायम वाईट दिसतं : विनायक मेटे

शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागीणी पारेख यांच्या उपस्थितीत आयोजित नेत्रशिबीरात सात हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
VINAYAK_METE
VINAYAK_METE

बीड : आपण नेहमी सामाजिक आणि लोकपयोगी कामांनाच प्राधान्य दिले आहे. समाजपयोगी कामांतही विघ्न आणण्याचा प्रयत्न लोक करतात. नेत्रतपासणी शिबीर होऊ नये यासाठीही प्रयत्न झाल्याचा आरोप शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. 

त्यांच्या डोळ्यात कुसळे गेली आहेत. मी तुमच्या डोळ्यातली घाण काढतो, तुम्ही राजकारणातली घाण बाहेर काढा, असे आवाहन श्री. मेटे यांनी केले.

चांगली दृष्टी आली की जग चांगलं दिसायला लागतं, मात्र काही लोकांची नजरच चांगली नाही. त्यांना कायम वाईट दिसतं, असा टोलाही त्यांनी या निमित्ताने विरोधकांना लगावला.

विनायक मेटे यांच्या पुढाकाराने शिवसंग्रातर्फे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेत्रशिबीर झाले. शिबीरात ६९३२ रुग्णांची तपासणी करुन ३७१९ रुग्णांना शिवसंग्रामतर्फे मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

 सोबतच ९५२ रुग्णांची शस्रक्रिया आवश्यक आहे. त्यांची मोफत शस्रक्रिया मुंबई येथे जे जे रुग्णालयात करण्यात येणार आहे. लोकांना चांगलं दिसावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. जगाने डोक्यावर घेतलेल्या बीडच्या डॉ. लहानेंच्या हातांनी हे काम होत असेल तर ते भाग्यच असल्याचे मेटे म्हणाले. 

बीडमध्ये काही लोकांच्या डोळ्यावर धुरळं आलेली असून त्यांना कायम वाईट दिसतं. या लोकांच्या डोळ्यांचं ऑपरेशन कोणाकडून करावं हे समजत नाही. या लोकांच्या डोळ्यांवर दूषित पडदा पडला आहे. अशा लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन हा सातत्याने वाईटच असतो. त्यांना चांगलं कधी दिसतच नाही. म्हणूनच आजचा कार्यक्रम रद्द कसा होईल, यासाठीही प्रयत्न केले गेले असा आरोपही विनायक मेटे यांनी केला. 

बीड जर स्वच्छ ठेवायचे असेल तर दुष्परिणाम करणारे लोकही बाहेर काढावे लागतील, असे आवाहन श्री . मेटे यांनी  केले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com