...तर पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसता: मेटे 

पंकजा मुंडे यांनी राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे जो शब्द टाकला तो पाळला गेला.
pankaja munde
pankaja munde

पुणे : "पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपच्या नेत्यांनी केलेला नाही. पंकजा मुंडे यांना अडचणीच्या काळात पक्षाने साथ दिली. विरोधक जेव्हा त्यांच्यावर आरोप करत होते तेव्हा पक्ष त्यांच्यासोबत राहिला. त्यांचा पराभव भाजपने केला असं म्हणणे चुकीचे आहे," असे मत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले.

"लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या पाठीशी केंद्रातील आणि राज्यातील नेते नेहमीच उभे राहिले आहेत. त्यांच्या शब्दाला भाजपमध्ये मोठी किंमत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप तळागाळात रुजवण्यासाठी जे कष्ट घेतले त्याचा पक्षाच्या नेत्यांना आदर आहे. पंकजा मुंडे यांनी राज्याच्या आणि देशाच्या नेतृत्वाकडे जो शब्द टाकला तो पाळला गेला. त्या भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवाबद्दल पक्षाकडे बोट दाखवणे चुकीचे आहे "असे मेटे म्हणाले.

"गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट होती. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यामुळे सहानुभूती होती. तरीही पंकजाताईंचा केवळ 21 हजारांनी विजय झाला. जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र भाजपचे उमेदवार मोठया मतांनी निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची परळी मतदारसंघावरची पकड कमी झाली. पंचायत समितीत त्यांचा पराभव झाला. नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा एकही सदस्य निवडून आला नाही. त्या पराभवानंतर त्यांनी जर योग्य लोकांना सोबत घेऊन नियोजन केले असते तर त्यांचा पराभव झाला नसता" असे मेटे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com