विनायक मेटेंसाठी लकी निवडणुक; समर्थक जिंकले अन् विरोधक हारले

लोकसभेला विरोध करुनही भाजप मोठ्या फरकाने जिंकल्याने त्यांची जागा कळाली अशी उपाहसना वाट्याला आलेल्या विनायक मेटे यांच्यासाठी अनेक अर्थाने ही निवडणुक लकी ठरली आहे. उमेदवारी कटली असली तरी विनायक मेटेंचा दुहेरी विजय या निवडणुकीमुळे झाला आहे. एक तर त्यांचे तीनही समर्थक जिंकले असून घटकपक्षातील जिल्ह्यातील त्यांचे विरोधक नेते हरले आहेत.
Vinayk Mete and Devendra Fadanavis
Vinayk Mete and Devendra Fadanavis

बीड : लोकसभेला विरोध करुनही भाजप मोठ्या फरकाने जिंकल्याने त्यांची जागा कळाली अशी उपाहसना वाट्याला आलेल्या विनायक मेटे यांच्यासाठी अनेक अर्थाने ही निवडणुक लकी ठरली आहे. उमेदवारी कटली असली तरी विनायक मेटेंचा दुहेरी विजय या निवडणुकीमुळे झाला आहे. एक तर त्यांचे तीनही समर्थक जिंकले असून घटकपक्षातील जिल्ह्यातील त्यांचे विरोधक नेते हरले आहेत.

पंकजा मुंडेंचा परळीतून तर जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमधून पराभव झाल्यामुळे विनायक मेटे यांच्या भविष्यातील मंत्रीपदाच्या वाटचालीतील अडथळे काही प्रमाणात कमी झाल्याचे मानले जाते. पुर्वी मेटेंच्या मंत्रीपदाला टोकाचा आणि थेट विरोध करणे अवघड आहे. अर्थात त्यांच्या मंत्रीपदाचा भाजप आणि मुख्यमंत्री विचार करतील का, हा मुद्दा वेगळा आहे. मागच्या निवडणुकीत महायुतीसोबत असलेल्या शिवसंग्रामला भाजपने दिलेल्या तीन जागांपैकी खुद्द विनायक मेटेसह इतर एक जण पराभूत झाला होता. तर, भारती लव्हेकर एकट्याच विजयी झाल्या होत्या. 

तरीही घटक पक्षाचे नेते म्हणून त्यांचे मंत्रीपदासाठी नाव पुढे आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावत विनायक मेटे यांना मंत्रीपद मिळू दिले नव्हते. त्या रागापोटी विनायक मेटे यांनीही लोकसभेला थेट त्यांच्या बहिण डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मागच्या पाच वर्षांत भाजप - विरुद्ध राष्ट्रवादीपेक्षा भाजप विरुद्ध विनायक मेटे असाच सामना जिल्ह्यात रंगला. दरम्यान, मागच्या पाच वर्षांपासून बीडमधून तयारी करणारे मेटे बीडमधून इच्छुक होते. परंतु, त्यांच्या शिवसंग्रामला वर्सोवा, चिखली, किनवट या तीन जागा सोडल्या. तर, बीडमधून युतीत शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर लढले. विनायक मेटे यांनी राज्यात आणि जिल्ह्यातही महायुतीसोबत अशी भूमिका जाहीर केली. परंतु, जिल्ह्यातील महायुतीच्या सहा उमेदवारांपैकी एकाच्याही बॅनर वा पोस्टरवर शिवसंग्राम असा उल्लेख आणि विनायक मेटे यांचा फोटो टाकला गेला नाही.

एकूण महायुतीतल्या घटक पक्षाचे नेते असूनही त्यांना प्रचारासाठी कोणी बोलावले नाही. कोणाची इच्छा असली तरी पंकजा मुंडेंची नाराजी नको म्हणून कोण्या उमेदवाराने तसे धाडस केले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनाही हा अपमान वाटला. मात्र, निकालानंतर त्यांच्या समर्थकांच्या आनंदापुढे आकाश ठेंगणे पडले आहे. कारण, पंकजा मुंडे यांचा परळीतून आणि जयदत्त क्षीरसागर यांचा बीडमधून पराभव झाला आहे. मागच्या वेळी जिल्ह्यातील पाच आमदारांसह इतर आमदारांचे समर्थन असल्याने त्यांनी मेटेंच्या मंत्रीपदाला थेट विरोध केला होता. आता त्यांचा तर पराभव झाला असून समर्थकांची संख्याही घटली आहे. तर, जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेतून मंत्री केल्यानंतर एका जिल्ह्यात तीन कसे, यामुळेही मेटेंना अडचण आली असती. 

पण, आता हे स्पर्धकही कमी झाले आहेत. तर, मागच्या वेळी एका आमदाराच्या जोरावर मंत्रीपदाच्या स्पर्धेत आलेल्या विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे पण भाजपच्या उमेदवारीवर तीन समर्थक विजयी झाले आहेत. किनवटमधून भीमराव केराम, वर्सोवातून डॉ. भारती लव्हेकर व चिखलीतून श्वेताताई महाले यांचा समावेश आहे. त्यामुळे समर्थक जिंकले आणि विरोधक हरल्याने ही निवडणुक विनायक मेटेंसाठी लकी ठरली आहे. महायुतीच्या विजयाच्या जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिवसंग्रामचे विनायक मेटेही होते. आता, मंत्रीमंडळात सोबत असतील का, हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com