आजचा वाढदिवस - आमदार विनायक मेटे  - Vinayak Mete Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस - आमदार विनायक मेटे 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 जून 2019

आजचा वाढदिवस (रविवार, ता. ३० जून) आमदार विनायक मेटे (अध्यक्ष : शिवस्मारक समिती तथा संस्थापक अध्यक्ष शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषद) - सुरुवातीपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय असलेल्या विनायक मेटे यांनी स्वत:च्या संघटनेच्या माध्यमातून आरक्षण परिषदा, मेळावे, मोर्चे, जनजागृती सभा तसेच आरक्षण देता कि जाता असे मोर्चे काढले. आरक्षणासाठी १९९० मध्ये त्यांनी विधानभवन परिसरात आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवस्मारक उभारणीची मागणीही त्यांनी सातत्याने लाऊन धरली. यासह मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

राजेगाव (ता. केज) येथील रहिवाशी असलेले विनायक मेटे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेले. यावेळी मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला आणि यातूनच त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. पहिल्या युती सरकारच्या काळात त्यांना विधान परिषदेवर संधी भेटली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे त्यांना उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी दिली.  मागच्या लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली. पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण केली. आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य तसेच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. 

सुरुवातीपासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय असलेल्या विनायक मेटे यांनी स्वत:च्या संघटनेच्या माध्यमातून आरक्षण परिषदा, मेळावे, मोर्चे, जनजागृती सभा तसेच आरक्षण देता कि जाता असे मोर्चे काढले. आरक्षणासाठी १९९० मध्ये त्यांनी विधानभवन परिसरात आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवस्मारक उभारणीची मागणीही त्यांनी सातत्याने लाऊन धरली. यासह मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, दिवंगत गोविंदभाई श्रॉफ, डॉ. तात्यावर लहाने आदींचा गौरव करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख