मुख्यमंत्री उद्धवजी.. राज्यातील महिला सुरक्षिततेकडेही लक्ष द्या, फक्त सरकारची सुरक्षितता बघू नका : विनायक मेटे

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कधीही सरकार कोसळेल आणि मुदतपूर्व निवडणुका होतील असे भाकीत वर्तविल्यानंतर माझे सरकार सुरक्षित आहे असा विश्वास व्यक्त करत, पाडून दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर विनायक मेटे यांनी त्यांना टोला लगावला आहे
Vinayak Mete Appeals CM to look After Women Security
Vinayak Mete Appeals CM to look After Women Security

बीड : राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. हिंगणघाट येथील घटना ताजी असतानाच पुन्हा महिला अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त सरकारची सुरक्षा पाहण्यापेक्षा महिला सुरक्षेकडेही लक्ष द्यावे, असा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लगावला आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या निमंत्रितांच्या परिषदेत राज्य सरकार केव्हाही कोसळेल आणि पुन्हा निवडणुका लागतील असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यानंतर आपले सरकार सुरक्षित असून पडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. यावर, आमदार विनायक मेटे यांनी फेसबुक पोस्ट लिहून हे आवाहन केले आहे. 

हिंगणघाट येथील घटना घडलेली असताना नाशिकच्या लासलगावमध्ये बस स्थानकावर महिलेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना समोर येत आहे. चार ते पाच जणांनी मिळून पीडित महिलेवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असून प्राथमिक माहितीनुसार, ही महिला ५० टक्के भाजली असल्याचे कळले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा असतानाच जिल्ह्यात घडलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे सातत्याने होत असलेल्या अत्याचारातून दिसून येत आहे असेही मेटे यांनी म्हटले आहे. 

यात मेटे म्हणतात....
.....उल्हासनगर मध्ये पतीने पत्नीस अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तिसरी घटना ही अशीच घडून आली असून स्वयंपाक न केल्यामुळे दारुड्या नवऱ्याने २ वर्षाच्या चिमुकल्यासमोर पत्नीला लोखंडी हातोडा आणि लोखंडी टोच्याने संपूर्ण शरिरावर वार करीत हालहाल करुन ठार मारले. औरंगाबाद येथी बीडबायपासवरील अरुणोदय कॉलनीत शनिवारी सकाळी हे भयंकर क्रौर्य उघडकीस आले. ह्या तिन्ही घटना काल दिवसभरात घडलेल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महिला सक्षमीकरण बाजूलाच राहिले असून महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येक दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून या घटनांची संख्या वाढत चालली आहे. राज्य सरकार, पोलीस प्रशासन काय करत आहे? मुख्यमंत्री उद्धवजी, फक्त सरकारची सुरक्षितता बघत असताना महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार करा, असे आवाहन विनायक मेटे यांनी केले आहे. जनतेमध्ये अशा विकृत प्रकारांमधून रोष निर्माण होत असून राज्यात महिला असुरक्षित झालेल्या आहेत......

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com