विनायक मेटे विधान परिषदेच्या समितीवर विशेष निमंत्रित

विनायक मेटे विधान परिषदेच्या समितीवर विशेष निमंत्रित

बीड : नवीन सरकारच्या एका समितीमध्ये शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना संधी मिळाली आहे. विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर ते विशेष निमंत्रीत सदस्य असतील. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नेमणूक केली आहे. 

सध्याच्या विधान परिषदेत विनायक मेटे सर्वात सिनिअर आहेत. मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षण लढ्याच्या चळवळीतून पुढे आलेल्या विनायक मेटे यांना प्रथम युती सरकारमध्ये विधान परिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुन्हा तीन वेळा विधान परिषदेवर संधी मिळाली. मागच्या वेळी भाजपनेही त्यांना पुन्हा विधान परिषदेवर घेतले. दरम्यान, त्यांना मागच्या सरकारने आंतरराष्ट्रीय शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केले होते. आता नवीन सरकारमध्येही त्यांना विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर स्थान मिळाले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समितीचे सदस्य आहेत. तर तीन विशेष निमंत्रितांत विनायक मेटे यांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com