vinayak mete and cm | Sarkarnama

अभिजीतच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी मेटेंची धाव थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

बीड : मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या अभिजीत देशमुख याच्या कुटुंबियांना सरकारच्या मदतीच्या ठोस आश्वासनासाठी मंगळवारी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. स्थानिक युवकांच्या संपर्कात राहून शांततेत अंत्यसंस्कार पार पाडण्याचे आवाहन केले. केज तालुक्‍यातील विडा येथील अभिजीत देशमुख या उच्चशिक्षीत तरुणाने मंगळवारी गळफास लाऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षणासह बॅंकेचे कर्ज, औषधींचा खर्च यासाठी जात असल्याचा उल्लेख आढळला. 

बीड जिल्ह्यात पंधरवाड्यापूर्वी पेटलेली आरक्षण मागणीच्या ज्योतीने आता राज्यात ज्वालेचे रुप धारण केले आहे. हिंसक आंदोलनाबरोबर आता आरक्षण मागणीसाठी मराठा तरुण बलिदानही देत आहेत. त्यातच मंगळवारी बीड जिल्ह्यात ही घटना उघड झाली. त्यामुळे युवकांनी बंद पाळून उत्तरीय तपासणी रोखत अभिजीतच्या कुटूंबियांना मदत आणि भावाला नोकरीच्या लेखी आश्वासनाची मागणी केली. यामुळे परिस्थिती चिघळण्याचीही शक्‍यता होतीच. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार विनायक मेटे यांनी ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाशी बोलणेही करुन दिले. या काळात त्यांनी कायम स्थानिक युवकांशी मोबाईलवरुनही संपर्क सुरु ठेवत सर्व माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाची कारवाई होत होती. एका वेळी मुख्यमंत्री मंत्रीमंडळाच्या बैठकीत असताना नोकरीच्या आश्वासनाचा मुद्दा समोर आला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सचिवांशी संपर्क करुन त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना बोलायला भाग पाडले. एकूणच अभिजीत देशमुख याच्या कुटूंबियांना शासनाचा आधार मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगीरी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख