ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी विनायक मेटेही शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांकडे

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी विनायक मेटेही शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांकडे

पुणे : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काल ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांना पाठिंबा देऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच ब्राह्मण संघटनांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

ब्राह्मण समाजाला आरक्षण, पुरोहितांना पेन्शन, ब्राह्मण महामंडळाची स्थापना अशा विविध मागण्यांसाठी काल मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनही करण्यात आले. त्यात विविध पक्षांच्या मंडळींनी येऊन आंदोलनाचा पाठिंबा दिला. मराठा संघटनांचे नेते म्हणून ओळख असलेल्या मेटे यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

त्यानंतर या संघटनांतर्फे दहा जणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेले. तेथेही मेटे यांनी मुख्यमंत्र्यांशेजारी बसून या मागण्या ऐकल्या. जणू आपणच शिष्टमंडळाचे नेतृत्त्व करत असल्याचा देखावा मेटेंनी केल्याची टीका करत काहींना ही मेटेंची घुसखोरी वाटली. तर काहींना मेटे आता सर्व समाजाचे नेते होण्याच्या प्रयत्नात असल्याचे वाटले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com