विनय कोरेही सोडणार भाजपची साथ?

आज सकाळपासून भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणी २७ नोव्हेंबरला घेण्याचा दिलेला आदेश, अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा या धक्क्यानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे
Vinay Kore May Join MahaVikasAghadi
Vinay Kore May Join MahaVikasAghadi

मुंबई : राज्यात सकाळपासून भारतीय जनता पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही भाजपची साथ सोडण्याच्या मार्गावर आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्याची कोरे यांची तयारी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार यांच्याकडे निरोप पाठवल्याचे समजते. 

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपच्या गोटात आले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राज्यातल्या राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज सकाळी पहिला धक्का भाजपला बसला. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच (ता. २७) रोजी राज्यात बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असून विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com