कुलभूषण जाधवांच्या मूळगावी आनेवाडीत ग्रामस्थांनी साखर वाटली 

कुलभूषण जाधव हे गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. हेरगिरी प्रकरणातून त्यांना पकिस्तानने ताब्यात ठेवले आहे. निकाल काहीही लागू भारत सरकारने त्यांना सोडवून त्यांच्या सारख्या देशप्रेमी कमांडरवर अन्याय होऊ देवू नये, असे मत आनेवाडीचे ग्रामस्थ व कुलभूषणचे मित्र सदाशिव टिळेकर यांनी व्यक्त केले.
Kulbhushan-Jadhav-village
Kulbhushan-Jadhav-village

सायगांव (ता.वाई, जि. सातारा) : कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज स्थगिती दिली. याचा आज कुलभूषण जाधव यांचे मुळगाव असलेल्या आनेवाडी (ता जावली) येथील ग्रामस्थांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

आनेवाडी येथील मुळचे रहिवासी असलेले कुलभूषण जाधव यांचे कुटुंबिय मुंबईत वास्तव्यास होते. कुलभूषण हे नौदलाचे सेवानिवृत्त कमांडर होते. कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी केल्यावरून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी आनेवाडी ग्रामस्थ सुन्न झाले होते. मात्र, आज त्यांच्या खटल्याची आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार होती. यामध्ये काय निकाल होणार याची उत्सुकता होती. त्यांच्या सुटकेच्या प्रतिक्षेत येथील ग्रामस्थ आहेत. 

गेल्या आठ ते नऊ वर्षापासून या ठिकाणी श्री. जाधव यांनी पुणे बंगलूर महामार्गाशेजारी असणाऱ्या आनेवाडी (ता. जावली) येथील पाटबंधारे वसाहती शेजारी शेतीजमीन घेऊन येथे फार्म हाऊस बांधले होते. त्यांचे वडील निवृत्त पोलिस होते. ते आपल्या कुटुंबियासमवेत वर्षातून तीन ते चार वेळा सुट्टीसाठी या फार्म हाऊसवर राहण्यासाठी येत असत. येथे आल्यावर कुलभूषण जाधव सामाजिक कामात व्यस्त राहात. नवीन भावी पिढी सक्षम व्हावी हा त्यांचा उद्देश होता. आपल्या सामाजिक कार्यामुळे ते अल्पवधित सर्वपरिचित झाले होते. आनेवाडी परिसरातील विविध शाळांत जाऊन तेथील मुलांना शैक्षणिक वस्तु देऊन मदत करत होते. देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे धडे ते मुलांना देत असत. कुलभूषण जाधव प्रत्येक कामात कार्यात हिरहिरिने भाग घेणारे म्हणून त्यांचे या भागात नाव होते. 

मागील काही वर्षात कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने हेरगिरी करतोय म्हणून पकडले होते. त्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने नेल्याने आज याप्रकरणी सुनावणी होऊन निर्णय होणार होता. त्यामुळे श्री. जाधव यांची निर्दोष मुक्तता होईल, या आशेवर आनेवाडी ग्रामस्थ होते. आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे आज आनेवाडी ग्रामस्थांनी जल्लोष करून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com