"गाव तेथे कॉंग्रेस', बाळासाहेब थोरातांची घोषणा

मंत्री थोरात म्हणाले, ""मुस्लिम आरक्षणासाठी समिती स्थापन केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल.''
balasaheb and panja
balasaheb and panja

नगर : "अयोध्येतील राममंदिराला शिवसेनेतर्फे एक कोटीची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्याचे स्वागतच आहे. श्रीराम सर्वांचेच आहेत'' असे स्पष्टीकरण करीत आगामी काळात गाव तेथे कॉंग्रेसची शाखा करण्याची घोषमा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली.

मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत आज जिल्हा कॉंग्रेसची बैठक झाली.थोरात म्हणाले, ""देशात दंगली घडत असताना भाजप सरकार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करण्यात गुंतली होती,

ही मोठी शोकांतिका आहे. देश, राज्यघटना वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी कॉंग्रेसला नवी ऊर्जा, नवी दिशा देण्यासाठी, "गाव तेथे कॉंग्रेस'च्या स्थापनेसाठी एकजुटीने काम करा. 

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यातील चारपैकी दोन जागांवर "राष्ट्रवादी'चे ज्येष्ठ नेते शरद पवार, फौजिया खान यांची नावे समोर येत आहेत. कॉंग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. कॉंग्रेसचा उमेदवार देण्यासाठी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहोत.''

शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे सरकार स्थापन
थोरात म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत अचानक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी आली; मात्र आपण ती यशस्वीरीत्या पार पाडली. पक्षाला 44 जागा मिळाल्या. सरकार स्थापन होऊ नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते; परंतु शिवसेनेने ठाम भूमिका घेतल्याने सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकार हितकारक अनेक निर्णय घेत असल्याचे समाधान आहे.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com