Village bodies make resolutions to give loan waiver for farmers | Sarkarnama

ग्रामसभांनी घेतले कर्जमाफीचे ठराव 

सरकारनामा ब्युराे
सोमवार, 1 मे 2017

शेतकरी कर्जमुक्तीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हे ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले हाेते. 

अकोला : निसर्गाची अवकृपा, डाेक्यावर कर्जाचा डाेंगर अाणि शासन, प्रशासनाच्या उदासिन कारभारामुळे राज्यात शेतकरी अात्महत्यांचे सत्र सुरूच अाहे. अार्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाेबतच त्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या मागणीचे ठराव साेमवार (ता.एक) महाराष्ट्र दिनानिमित्त अायाेजित विशेष ग्रामसभांमध्ये घेण्यात अाले. 

शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष अादी विराेधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढली. शेतकरी कर्जमुक्तीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हे ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले हाेते. 

त्या अनुषंगाने त्यांनी राज्यातील हजारो ग्रामपंचायतींना ईमेल व टपालद्वारे पत्रेही पाठविली. शेतकरी कर्जमाफी व शेतमालाच्या हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असताना राज्याचा पोशिंदा असलेल्या बळीराज्याला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून ग्रामसभांमध्ये ठराव घेण्यासाठी प्रयत्न केले. यासाेबतच शेतकरी जागर मंचच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यातील सरपंचांशी संपर्क करून कर्जमुक्तीचे ठराव घेण्यासाठी पुढाकार घेतला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख