मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या विलासरावांनी धारियांच्या स्लिपा वाटल्या होत्या....

मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेल्या विलासरावांनी धारियांच्या स्लिपा वाटल्या होत्या....

पुणे : लोकसभेच्या 1971 च्या पोटनिवडणुकीत मतदारांना स्लिपा वाटणारा महाविद्यालयीन विद्यार्थी. पक्षाच्या प्रत्येक चळवळीत उत्साहाने भाग घेणारा आणि सर्वांशी संपर्क ठेऊन राहणार हा विद्यार्थी कॉंग्रेसमध्ये भलताच यशस्वी झाला. विद्यार्थी चळवळीपासून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या या खऱ्या कार्यकर्त्याची आज पक्षाला खरी गरज होती. या शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या. 

विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन. या निमित्ताने कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांनी आज लातूरला जाऊन विलासरांच्या समाधीला अभिवादन केले. उल्हास पवारदेखील दरवर्षी न चुकता लातूरला जातात. लातूरवरून बोलताना त्यांनी विलासराव एक कॉंग्रेस कार्यकर्ता, मंत्री, मुख्यमंत्री व तितकाच जवळचा मित्र या टप्प्यातील आठवणींना उजाळा दिला.

पवार यांनी विलासरावांची 1971 साली पुण्यातील आठवण सांगितली. ते म्हणाले, " 71 साली लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत मोहन धारिया हे कॉंग्रेसचे उमेदवार होते. विलासराव तेव्हा आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील शिक्षण संपवून विधी महाविद्यालयात लॉच्या शेवटच्या वर्षाला होते. मतदाना दिवशी गरवारे महाविद्यालयाच्या मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्लिपा वाटत होते. त्यांना दिलेले काम त्यांनी प्रामाणिकपणे केले होते. शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असल्याने धारिया यांच्याबरोबर शहरातील सर्व केंद्रांना भेटी दिल्यानंतर आम्ही गरवारे महाविद्यालयाच्या केंद्रावर पोचलो. तेथे विलासराव होते. मी धारिया यांच्याशी विलासरांवाची ओळख करून दिली व लॉ करीत असलेला एक चांगला कार्यकर्ता असल्याचे त्यांना सांगितले.

त्यावर धारिया यांनी विलासरावांची पाठ थोपटली व वकील झालात तरी राजकारणात नक्की या, तुमच्यासारख्या चांगल्या लोकांची पक्षाला गरज आहे, असे सांगितले. धारिया यांनी व्यक्त केलेली भावना भविष्यात विलासरावांनी खरी करून दाखवली. केवळ एवढेच नव्हे तर नंतरच्या काळात त्यांनी त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्तेदेखील घडवले, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com