... त्यांचा पुतळा करावा लागेल असे कधी वाटले नव्हते !

... त्यांचा पुतळा करावा लागेल असे कधी वाटले नव्हते !

लातूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा साकारलेले शिल्पकार एस. बी. परदेशी यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा साकारला आहे. पण ज्या लोकप्रिय नेत्याच्या हस्ते माझ्या अनेक पुतळ्यांचे अनावरण झाले, त्यांचाच पुतळा साकारण्याची अशी वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते, अशी भावना परदेशी यांनी व्यक्त केली 

मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे विलासरावांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून याचे लोकार्पण आज करण्यात आले. यानिमित्ताने 'सकाळ'ने परदेशी यांच्याशी संवाद साधला. परदेशी हे ज्येष्ठ शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे शिष्य आहेत. त्यांच्याकडून परदेशी यांनी वयाच्या 16 व्या वर्षांपासून शिल्पकलेचे धडे घेतले. पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर परदेशी यांचा स्वतःचा कारखाना आहे. तेथेच विलासरावांचा हा पुतळा आकाराला आला आहे. 

परदेशी म्हणाले, विलासरावांचा हा पूर्णाकृती पुतळा ब्रॉंझचा असून तो साडेबारा फूट उंचीचा आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून तो तयार करण्याचे काम सुरु होते. यासाठी आमची सात जणांची टीम अहोरात्र झटत होती. विलासरावांची चालण्या-बोलण्याची ढब, त्यांचे प्रसन्न हास्य, त्यांचा रुबाबदारपणा, त्यांचे हातवारे या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही सुरवातीला वेगवेगळ्या वयातील विलासरावांचे तीन चेहरे तयार केले. ते त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख, पुत्र अमित देशमुख आणि मित्र उल्हास पवार यांना दाखविले. सर्वानुमते एक चेहरा समोर ठेऊन आम्ही हा पुतळा तयार केला. कोणतीही उणीव राहणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली आहे. 
त्यांची उणीव सतत जाणवेल... 
मी साकारलेल्या अनेक पुतळ्यांचे अनावरण विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले आहे. पण त्यांचाच पुतळा साकारावा लागेल, असे कधी वाटले नाही. या लोकप्रिय नेत्याची उणीव आपल्याला आजही जाणवत आहे अशा भावना शिल्पकार एस. बी. परदेशी यांनी व्यक्त केल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com