लोकांचा मूड बदललेला आहे, तो गडकरींना कळलेला नाही  : मुत्तेमवार 

"नितीन गडकरी 2014 मध्ये मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आले होते. यावेळी तशी स्थिती नाही. यावेळी लोकांचा मूड बदललेला आहे, तो यांना कळलेला नाही. मोठ्या प्रमाणात लोक भाजपच्या विरोधात गेले, मोदी लाट ओसरली आहे
Gadkari-Muttemwar
Gadkari-Muttemwar

नागपूर :   "नितीन गडकरी 2014 मध्ये  मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आले होते. यावेळी तशी स्थिती नाही. यावेळी लोकांचा मूड बदललेला आहे, तो यांना कळलेला नाही. मोठ्या प्रमाणात लोक भाजपच्या विरोधात गेले, मोदी लाट ओसरली आहे आणि यांना स्वतःची लाटच तयार करता आली नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्‍याने निवडून येतील," असा विश्‍वास चार वेळा खासदार राहिलेले आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार म्हणाले. 

कॉंग्रेस पक्षात असलेल्या गटबाजीबाबत ते म्हणाले की, "पक्षात उमेदवारी मिळेपर्यंत गटबाजी असते, विविध गट सक्रिय असतात आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गट शांत होतात. शेवटी सर्व गटांचे अस्तित्व हे कॉंग्रेस पक्ष आहे. त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाण्याची हिंमत कुणी करणार नाही. त्यामुळे आताही गट कायम जरी राहिले, तरी ते गटागटाने पटोलेंचेच काम करतील आणि पक्षासाठी विजय खेचून आणतील."

1996, 97, 2004, 2009 आणि 2014 ला सोनिया गांधी प्रचार सभेसाठी येथे आल्या होत्या. यावेळी राहुल गांधी नक्कीच नागपुरात सभा घेतील, असा विश्‍वास मुत्तेमवार यांनी व्यक्त केला. राहुल गांधी आणि प्रियंका वद्रा यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करावे, अशी मागणी यापूर्वीच माजी महापौर विकास ठाकरे यांनी केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com