राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विक्रम कोठुळेंनी पेटवली अख्ख्या गावाची चूल!

"कोरोना'मुळे लॉकडाऊन झाल्याने शहरातील अनेक भागात सबंध परिसरच आयसोलेशन झाल्याचे चित्र आहे. येथील विहितगाव भागात ना किराणा, ना भाजीपाला अशी स्थिती आहे. या स्थितीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रम कोठुळे या युवकाने सहकाऱ्यांसह गेल्या तीन दिवसांपासून प्रत्येक घरात भाजीपाला, जीवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला.
vikram kothule gives food to poor families in vihitgaon of nahsik
vikram kothule gives food to poor families in vihitgaon of nahsik

नाशिक ः "कोरोना'मुळे लॉकडाऊन झाल्याने शहरातील अनेक भागात सबंध परिसरच आयसोलेशन झाल्याचे चित्र आहे. येथील विहितगाव भागात ना किराणा, ना भाजीपाला अशी स्थिती आहे. या स्थितीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विक्रम कोठुळे या युवकाने सहकाऱ्यांसह गेल्या तीन दिवसांपासून प्रत्येक घरात भाजीपाला, जीवनाश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यामुळे सामान्यांच्या घरातील चुल पेटली.

"कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. त्यातून गावात किंवा शहरात जिवनाश्‍यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला आदींचा पुरवठा शक्‍य होतो. मात्र सीमेवरच्या अन्‌ विशेषतः जीथे पोलिसांनी नाकेबंदी केली आहे त्या भागात अनेक अडचणी येतात. नाशिक रोड भागातील विहितगाव परिसरातील नागरीकांची अशीचोकंडी झाली होती. या भागात अल्पसंख्यांक, मजुर, गरीब कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. रोज कमवा अन्‌ रोज चुल पेटवा अशी स्थिती असलेल्या या वस्त्यांत संचारबंदीमुळे अडचणी वाढल्या. 

यावेळी ना आमदार, ना नेते, ना नगरसेवक कोणीच मदतीसाठी सापडत नव्हते. या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रभाग अध्यक्ष विक्रम कोठुळे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीला पोहोचले आहेत. गेले तीन दिवस ते या नागरीकांना घरपोच भाजीपाला व अन्य वस्तूंचा विनामूल्य पुरवठा करीत आहेत. बाजारच नाही तर वस्तू मिळणार कशा अशा स्थितीत श्री. कोठुळे त्यांच्या मदतीला धाऊन आले. त्यामुळे हातावरचे मजूर, सामान्यांच्या घरात चुल पेटली अशी प्रतिक्रीया येथील नागरीकांनी व्यक्त केली.

विहितगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील नगरसेवक शिवसेनेचा. माजी महापौर शिवसेनेचाच. मात्र या अडचणीच्या काळात नगरसेविकेपर्यंत पोहोचणेच अवघड होऊन बसले आहे. संपर्क करुनही मदतीची अपेक्षा नसल्याने नागरीक व्यथीत झाले होते. या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पादधिकारी मदतीसाठी सक्रीय आहेत. विशेष म्हणजे त्यांचा या प्रभागातून महापालिका निवडणूकीत निसटता पराभव झाला होता. अशा स्थितीत विजयी नगरसेवक नाही मात्र पारभूत कामाला आल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com