धनगरांचे आरक्षण 3.50 वरून 7 टक्क्यांवर न्या!

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली. मात्र लोकसभेनंतर या समितीची एकही बैठक झालेली नाही. - विक्रम ढोणे
धनगरांचे आरक्षण 3.50 वरून 7 टक्क्यांवर न्या!

कोल्हापूर  : धनगर समाजाला भटक्या जमातीत सध्या 3.50 टक्के आरक्षण मिळते. ते लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्याने वाढवून किमान 7 टक्के करावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

श्री. ढोणे म्हणाले, "फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाचा विषय बासनात टाकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र त्यांना अजून निर्णय घेता येवू शकतो. त्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बैठक घ्यावी आणि अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय द्यावा. पहिल्या बैठकीत आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत आदिवासींच्या सवलती धनगर समाजाला लागू करण्याचे जाहीर केले आहे. याचा अर्थ सरकारच्या दृष्टीने धनगर समाज आदिवासी आहे. आदिवासी प्रवर्गात आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असते. त्यामुळे धनगरांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. धनगर समाजाला भटक्या जमातीत सध्या 3.50 टक्के आरक्षण मिळते. ते लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्याने वाढवून किमान 7 टक्के करावे."

पत्रकार परिषदेस श्रीकृष्ण बुरुंगले, अरुणा हाके, सुरेश कोकरे, नितीन वाघमोडे उपस्थित होते 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com