भाजपने बिरोबाला फसवले, त्याचे फळ बारामतीत मिळाले!

धनगर समाजाने ठरवले असतेतर पडळकरांचे डिपॉझिट वाचू शकले असते, मात्र समाजानेविचारपुर्वक निर्णय करत फडणवीसांनी बारामतीत येवून केलेल्या फसवणुकीचा बारामतीतचबदला घेतला आहे.
भाजपने बिरोबाला फसवले, त्याचे फळ बारामतीत मिळाले!

बारामती (जि. पुणे): बारामती विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा राज्यात उच्चांकी मतांनी पराभव करून सर्वपक्षिय धनगर समाजाने एकप्रकारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच डिपॉझिट जप्त केले आहे. या निकालातून आरेवाडीच्या बिरोबाचा कोप बारामतीत पहायला मिळाला, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे केली आहे.

धनगर आरक्षणप्रश्नावरून भाजपने केलेल्या फसवणुकीच्यासंदर्भाने ढोणे आजवर भुमिका मांडत आले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकलासंदर्भात बोलताना ढोणे आज म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे येवूनच धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र पाच वर्षात त्यांनी सकारात्मक असे काहीच केले नाही. सर्वेक्षणाच्या नावाखाली फक्त वेळ मारून नेली. आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारला पाठवली नाही, तसेच न्यायालयातही धनगरांच्या बाजूची भुमिका घेतली नाही. मात्र 1 हजार कोटीच्य़ा पॅकेजच्या नावाखाली खूप दिशाभूल केली. दुसऱ्या बाजूला पडळकरांसाख्या भाजप नेत्यांना धनगर आरक्षण आंदोलनात घुसवून आंदोलन हायजॅक केले. 

पडळकरांनी बिरोबाची शपथ घातल्याचा मुद्दाही बारामती निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला होता. मुळात शपथा घालण्याचा प्रकार चुकीचाच आहे, मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी पडळकरांनी आरेवाडीच्या बिरोबाचा वापर केला. तिथे दोन वर्षे दसरा मेळावा घेवून स्वत:चे महत्व वाढवले. सोयीनुसार राजकीय भुमिका बदलल्या. त्याला फडणवीसांचा आशिर्वाद होता. आपण काहीही केले तरी चालते, अशी अहंकाराची बाधा पडळकरांना झाली होती. वाटेल तेव्हा पक्षाचे काम, वाटेल तेव्हा आरक्षणाचा मुद्दा, वाटेल तेव्हा पक्षांतर यापद्धतीने समाजाचा खेळ त्यांनी चालवला होता. त्याचे उत्तर म्हणून बारामतीच्या निकालाने सणसणीत चपराक दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com