विखे आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढणार : सुजय विखेंचे संकेत

आगामी विधानसभा निवडणूक राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमधून लढवतील, असे संकेत आज त्यांचे पूत्र व नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे-पाटील यांनी आज दिले. सुजय विखे यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुखउद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे सुतोवाच केले.मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर राधाकृष्ण विखे- पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेल, असेही सुजय यांनी सांगितले.
विखे आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढणार : सुजय विखेंचे संकेत

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमधून लढवतील, असे संकेत आज त्यांचे पूत्र व नगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे-पाटील यांनी आज दिले.  सुजय विखे यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हे सुतोवाच केले. मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यावर राधाकृष्ण विखे- पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लागेल, असेही सुजय यांनी सांगितले. 

आज राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे महाजन यांनी या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था दारूण झाली आहे. अवघी एक जागा काँग्रेसला जिंकता आली आहे. सुजय विखे पाटील हे भाजपात गेल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात जातील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. आज खुद्द गिरीश महाजन यांनीच विखेंच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर व जयकुमार गोरे यांनी कॉंग्रैसला रामराम करत भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यापैकी अब्दुल सत्तार  यांना रावसाहेब दानवे यांनी गळाला  लावलेले असून त्यांची दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणलेली आहे .

कालिदास   कोळंबकर गेल्या वर्षभरापासून थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयावर ऐन लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र लावल्याने खळबळ उडाली होती . जयकुमार गोरे यांनीही लोकसभेला माढ्यात भाजपचे काम केले होते .  जूनच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेसचे हे बंडखोर आमदार भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील असे चित्र आहे.   याशिवाय पुणे,  सातारा , मराठवाडा खान्देश आणि नगर जिल्ह्यातही काही आमदारांशी भाजपची चर्चा  सुरु असल्याचे समजते . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com