विखे पाटील कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत : बाळासाहेब थोरात

''राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर कॉंग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी आहे. ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत. असा माझा विश्‍वास आहे. अन्य कोणाला मदत होईल असे काहीही ते करणार नाहीत असा माझा विश्‍वास आहे." असे प्रतिपादन माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
विखे पाटील कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत : बाळासाहेब थोरात

नाशिक : ''राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर कॉंग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी आहे. ते कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत. असा माझा विश्‍वास आहे. अन्य कोणाला मदत होईल असे काहीही ते करणार नाहीत असा माझा विश्‍वास आहे." असे प्रतिपादन माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

नगर मतदारसंघाचे निरिक्षक अंकुश काकडे यांनी विखे- पाटील यांना पत्र लिहून राष्ट्रवादी कॉंग्रेस व आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करीत असल्याने खुलासा मागविणारे पत्र त्यांना पाठविले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर थोरात यांनी अत्यंत मोजक्‍या शब्दात माहिती दिली. ते म्हणाले, "विखे पाटील हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. कॉंग्रेस पक्षाची मोठी जबाबादारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते नगर मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठीच काम करीत आहेत. पक्षाच्या विरोधात ते काहीही करणार नाही. तसे काही करतील असे मला वाटत नाही." अन्य प्रश्‍नांवर मात्र 'यापेक्षा अधिक मला काहीही सांगता येणार नाही' असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज नाशिक तसेच धनराज महाले यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी प्रथम दुष्काळ व पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शक्ती प्रदर्शन टाळुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी, हुतात्मा जवानाची वीरपत्नी, राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी खेळाडु आणि बेरोजगार युवकांना बरोबर घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी  थोरात, रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com