सर्वपक्षीय बैठक हे उशिरा सुचलेले शहाणपण : राधाकृष्ण विखे पाटील 

मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी विखे पाटील यांनी येत्या सोमवारी (ता. 30) विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार असून, त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.
Congress Radhakrishna Vikhe Patil
Congress Radhakrishna Vikhe Patil

मुंबई : मराठा आरक्षणावर सरकारने शनिवारी बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे 'उशिरा सुचलेले शहाणपण' असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. ते म्हणाले, की राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षांनी मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केले. या मुद्यावर सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईसाठी सरकारने सांगितलेल्या कारणांवर विरोधी पक्ष समाधानी झाला नाही. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही आजच्या बैठकीत लावून धरली व त्यादृष्टीने सूचनाही मांडल्या.

ते पुढे म्हणाले, "राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल लवकरात लवकर तयार केला जावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नसल्याचे आम्ही या वेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणीही आम्ही या वेळी मांडली.'' 

मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याची तक्रार आम्ही या वेळी केली. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने समाजकंटक वगळता अन्य सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. 

काँग्रेसची उद्या बैठक
मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी विखे पाटील यांनी येत्या सोमवारी (ता. 30) विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार असून, त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com