विखे पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. एकवीस संचालकांच्या या मंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे.
vikhe patil sugar factory director elected unopposed
vikhe patil sugar factory director elected unopposed

शिर्डी ः पद्‌मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. एकवीस संचालकांच्या या मंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे.
 
आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसांपर्यत उर्वरीत तेरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी काम पाहिले. तहसीलदार कुंदन हिरे यांनी त्यांना सहकार्य केले. नूतन संचालक मंडळाने प्रवरानगर येथे जाऊन कारखान्याचे संस्थापक पद्‌मश्री विठ्ठलराव विखे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

या निवडणुकीत केवळ विखे समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विरोधी गटाकडून अर्ज दाखल झाले नव्हते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार होती. कारखान्याचे मार्गदर्शक आमदार विखे पाटील यांनी काल नूतन संचालक मंडळाची यादी निश्‍चित केली. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आज हे सर्व अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केले.

दहा नवीन चेहऱ्यांना संधी
आज ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यत आमदार विखे पाटील हे येथील विश्रामगृहावर ठाण मांडून बसले होते. अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊन निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर झाल्यानंतर ते नूतन संचालक मंडळा समावेत प्रवरानगरकडे रवाना झाले. नव्या संचालक मंडळात दहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. कर्जमाफी होईल या आशेने बहुतांश सभासद कर्ज थकवून व्याजाचा भुर्दंड सहन करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बिगर थकबाकीदार उमेदवार मिळणे दिव्य होऊन बसले. काही उमेदवारांवर संचालक होण्यासाठी कर्ज भरण्याची वेळ आली.

नूतन संचालक मंडळ
नूतन संचालक मंडळातील सदस्यांची नावे व त्यांचे गाव पुढील प्रमाणे, कैलास सूर्यभान तांबे (चिंचपूर), डॉ. दिनकर गणपत गायकवाड (आश्‍वी खुर्द), ऍड. भानुदास लहानू तांबे (दाढ बु.), देविचंद भारत तांबे (दाढ बु.), विश्‍वास केशव कडू(सात्रळ), उत्तम रामभाऊ दिघे (धानोरे), आमदार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील (लोणी बु.), दादासाहेब चंद्रभाग घोगरे (लोणी खुर्द), संजय सोपान आहेर (लोणी खुर्द), धनंजय बाबासाहेब दळे (भगवतीपूर), स्वन्पिल सुरेश निबे(कोल्हार बु.), दत्तात्रय साहेबराव खर्डे (कोल्हार बु.), साहेबराव जिजाबा म्हस्के (बाभळेश्‍वर), सतीश शिवाजीराव ससाणे(ममदापूर), संपत भाऊसाहेब चितळकर (मांडवे), उज्वला अशोक घोलप (हणमंतगाव), संगीता भास्कर खर्डे (भगवतीपूर), शांताराम गेणूजी जोरी (दाढ खुर्द), बाबू फकिरा पलघडमल (सात्रळ), सुभाष नामदेव अंत्रे(सोनगांव), रामभाऊ शंकरराव भुसाळ (उंबरी). 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com