लोणीच्या विखे पाटलांच काम असं असतं...

नगर जिल्ह्यातील रुग्णांसाठी चांगली सोय या रुग्णालयामुळे होणार आहे.
vikhe-patil-hospital
vikhe-patil-hospital

लोणी : कोरोनाविरोधात लढाईसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संस्थेने अवघ्या सहा दिवसांत "कोविद-19 हॉस्पिटल' या नवीन आयसोलेशन हॉस्पिटलची उभारणी केली. त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. 

भविष्यातील संकटाची चाहूल व या भागातील नागरिकांच्या काळजीपोटी रुग्णालय उभारले आहे. मात्र, त्याची कोणालाही गरज भासू नये, अशी भावनिक प्रार्थना विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी साईबाबांच्या चरणी केली.

गेल्या सहा दिवसांपासून अथक प्रयत्नांतून स्वयंप्रेरणेने 100 खाटांच्या या आयसोलेशन हॉस्पिटलच्या निर्मितीचे काम सुरू होते. आज त्याचे लोकार्पण झाले. कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराज, डॉ. राजवीर भलवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत ठाकूर, डॉ. सतीश महाजन उपस्थित होते.

डॉ. विखे पाटील म्हणाले, "कोविद-19' रुग्णालयात सहा खाटा आयसीयू व इतर 94 खाटा आयसोलेशनसाठी आहेत. त्यात लहान मुलांकरिता स्वतंत्र सोय आहे. हॉस्पिटलसाठी डॉक्‍टर, परिचारिका, टेक्‍निशियन, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गटही तयार असून, त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. रुग्णालयासाठी एकूण 500 स्टाफची गरज भासणार आहे. हे रुग्णालय चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असून, देणगीदार व्यक्ती व संस्थांनी त्यासाठी पुढे यावे.


राज्य सरकारने हे रुग्णालय चालविण्यासाठी निधी, तसेच निदान व चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी,'' खासदारांनी सक्रिय मदत करावी; फक्त आश्वासन नको, असा टोला डॉ. विखे पाटील यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांचे नाव न घेता लगावला. उद्योजक विलास थोरात, व्यापारी सुनील सोनी, कवी यशवंत पुलाटे यांनी आर्थिक मदतीचे धनादेश डॉ. विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com