vikhe patil nagar rally | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

असे कोणते काम भाजपने केले, की ज्यामुळे नगरच्या वैभवात भर पडली, विखे पाटलांचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नगर : नगरमध्ये असे कोणते काम भाजपने केले, की जे नगरच्या वैभवात भर घालणारे आहे. उड्डाण पुलाच्या गप्पा मारतात, उड्डाणपूल खरोखर होणार आहे का, की असेच झुलवत ठेवणार. यांच्या दहशतीमुळे नगरची औद्योगिक वसाहत लयाला गेली, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप व शिवसेनेवर केला. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते. या वेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब थोरात तसेच मान्यवर उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, की आता दिवस फिरले आहेत. सहा महिन्यांनी बदल घडणार आहे. येत्या लोकसभा व विधानसभेत आघाडीचे उमेदवार आघाडीवर असतील. देशात व राज्यात सत्तांतर होणार आहे. भाजप-शिवसेनेच्या काळात एकही काम चांगले झाले नाही. नगरच्या वैभवात भर पडणारी न्यायालयाची इमारतीसाठी आम्ही प्रयत्न केले. 

केवळ भपकेबाजी करून आणि सोशल मीडियाचा आधार घेवून हे सत्ता हस्तगत करू पाहत आहे. पण आता जनता सुज्ञ झाली आहे. एकदा फसली, आता फसणार नाही. सत्ता असूनही नगरला ठोस काय दिले. नगरमध्ये बेरोजगारी वाढतच चालली आहे. याला जबाबदार कोण. भाजप-शिवसेनेला मते मागण्याचा अधिकार नाही. सत्ता द्या, विकास काय असतो, ते दाखवून देवू, असे विखे पाटील म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख