राधाकृष्ण विखे पाटील काॅंग्रेस यात्रेत Emergency Exit वर

राधाकृष्ण विखे पाटील काॅंग्रेस यात्रेत Emergency Exit वर

पुणे : काॅंग्रेसचे राज्यातील नेते सध्या जनसंघर्ष यात्रेत भाजप सरकारविरोधात हल्ला बोल करत आहेत. कोल्हापूरमधून सुरू झालेली ही यात्रा सध्या सांगली जिल्ह्यात आहेत. फडणवीस सरकारविरोधात जनभावना चेतविण्याचे काम सुरू आहे. अशा आंदोलनात नेत्यांची भाषणे, त्यांची वाक्यांची फेक, त्यातील मानापमान यावरही चर्चा झडत असतात.

अशीच चर्चा घडते आहे ती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत. ही यात्रा आज सांगली जिल्ह्यात आहे. एका वाॅल्वो बसमधून काॅंग्रेसचे नेते एकत्रित प्रवास करत असतात. या बसच्या आसनाची विखे पाटलांना नेमकी emergency exit च्या पाॅइंटवर मिळाली आहे. प्रवासात काही अडचण निर्माण झाल्यास या पाॅइंटच्या काचा फोडून प्रवासी येथून बाहेर पडण्याची व्यवस्था असते.

नेमकी हीच जागा विखे पाटलांना मिळाल्याने तो साहजिकच चर्चेचा विषय झाला. विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्य आहे. फडणवीस हे विखे पाटलांच्या गावातही जाऊन आले होते. तेथे विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करून आघाडी सरकारच्या काळापेक्षा फडणवीस यांच्या काळात मतदारसंघाला जास्त निधी मिळाला, अशा आशयाचे विधान केले होते. विखे यांची भाजपच्या नेत्यांशी तेव्हाची जवळीक अनेकांच्या डोळ्यावर आली होती.

त्यानंतर विखेंनी अशी जवळीक करण्याचे टाळले असले तरी त्यांचा पक्षातील एक पाय हा emergency exit च्या दिशेने असल्याची अफवा त्यांचे पक्षातील विरोधक अधुनमधुन सोडत असतात. त्यामुळे विखेंना प्रवासातही योग्य जागा मिळाल्याचे अनुमान त्यांच्या विरोधकांनी काढले. यातील नक्की काय घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. पण विखेंनी बस प्रवासातही सुरक्षिततेसाठी `योग्य` जागा मिळाली, हे अनेकांच्या लक्षात आले. अद्याप राजकीय प्रवासाच्या सुरक्षिततेची गणिते गुलदस्त्यात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com