Vikhe Patil to donate Two Months honorarium for Corna Victims | Sarkarnama

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राधाकृष्ण विखे पाटील दोन महिन्यांचे मानधन देणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

नगर  : माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नगर  : माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याबाबत बोलताना आमदार विखे पाटील म्हणाले, की कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात एकजूटीने लढाई करण्याची वेळ आली आहे. याची सुरूवात स्वतःपासून करावी, म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.''

''कोरोना व्हायरसच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरी राज्यातील रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी योगदान म्हणून आता सहकार्याचे हात पुढे येवू लागले आहेत. उद्योग क्षेत्राने देखील मदतीसाठी एक पाउल पुढे टाकले आहे, ही समाधानाची बाब आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आपली असलेली जबाबदारी म्हणून दोन महिन्यांचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.'' असेही त्यांनी सांगितले. भविष्यात आणखी  काही निर्णय घेवून कोरोनाच्या विरोधातील या लढाईत योगदान देणार असल्याचेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख