vikhe nagar | Sarkarnama

राधाकृष्ण विखेंच्या संस्थांनीच शेतकऱ्यांना लुटले : कालिदास आपेट

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नगर : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते असलेले कालिदास आपेट यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेला शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल, तर संघर्ष यात्रा काढण्यापेक्षा विधिमंडळात एकत्र बसा. शेतकरी कर्जमाफीचा ठराव करा. खरे तर विखेंच्या ताब्यातील सहकारी संस्थांनीच शेतकऱ्यांना लुटले. त्यांना संघर्ष यात्रा काढायचा काय अधिकार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत. अजित पवारही सिंचन घोटाळ्यात अडकले. विरोधात बसले म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आला, अशी जोरदार टीका आपेट यांनी केली. 

शेतीप्रश्नासाठी नागपूरपासून सुरू झालेला आसूडमोर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वडनगरमध्ये (गुजरात) जाईल. तेथे शेतकरी रक्तदान करतील. सरकारचे रक्तदानाने भागणार नसेल, तर मंत्रालयात बॉम्ब फोडण्याची तयारी आहे, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी देऊन आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

श्रीरामपूरमध्ये आसुडमोर्चा दाखल झाल्यानंतर झालेल्या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, श्री आपेट आदी नेत्यांनी आक्रमक भाषण केल्याने शेतकऱ्यांच्या भावना अधिक संतप्त झाल्या. गुजरातमधील साखर कारखाना ऊसाला चार हजारांवर भाव देतात, मग महाराष्ट्रातच दोन हजार कसा काय भाव मिळतो, याचा जाब सरकारला विचारावा लागेल. विदेशातील तूर आयात केली जाते, मग शेतकऱ्यांची तूर खरेदी का होत नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या सभेत करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख