विखे पिता-पुत्रांवरील फोकस हटला...आता हा नेता `लाइम लाइट`मध्ये

राजकारणातील दिवस कसे पालटतात, हे चित्र नगर जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून येत आहे.
विखे पिता-पुत्रांवरील फोकस हटला...आता हा नेता `लाइम लाइट`मध्ये

नगर ः राज्यात सत्ता स्थापनेबाबतच्या राजकीय घडामोडींमध्ये नगर जिल्ह्यातून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भाजप सत्ता स्थापनेस असमर्थ आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी व काॅंग्रेसला सत्ता येण्याची चिन्हे असल्याने थोरात यांना मंत्रीपद मिळेल, यात शंका नाही. याबाबत संगमनेरमध्ये उत्सुकता आहे. संगमनेरसह जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे.

भाजपने सत्ता स्थापनेला असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे राज्यपालाचे निमंत्रण असल्याने राष्ट्रवादी व काॅंग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचे घाटत आहे. याबाबत मुंबई, दिल्ली येथे बैठका होत आहेत. त्यामध्ये काॅंग्रेसकडून राज्याचे नेतृत्त्व थोरात यांच्याकडे आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी थोरात वारंवर चर्चा करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसला राज्यात पुन्हा चांगले दिवस येण्याचे दिसत असून, सत्ता स्थापनेत थोरात यांना चांगले खाते मिळू शकेल, त्यामुळे संगमनेरमध्ये उत्सुकता शिगेला पोचली आहे.

.. तर विखेंना मोठी चपराक
भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील व काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैमनस्यातून विधानसभा निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात विखे यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर मात्र विखेंचा विरोध मावळल्याने थोरात यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. १२ विरुद्ध ० अशी घोषणा विखे पाटील यांनी केली होती, तथापि, निकालानंतर ही घोषणा हवेतच विरली. अशाही परिस्थितीत सत्ता स्थापन होताना काॅंग्रेसला संधी मिळू लागल्याने थोरात यांचे जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध होणार आहे. थोरातांना मंत्रीपद मिळाल्यास विखे पाटील यांना ही मोठी चपकार समजली जाणार आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते, नंतर भाजपला फोडाफोडी करण्यासाठी मदत करणारे, नगरमध्ये काॅंग्रेसला दणका देण्याच्या वल्गना करणारे नेते म्हणून विखे पाटलांवर पाच वर्षे फोकस होता. आता हा फोकस थोरातांकडे शिफ्ट झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com