मुख्यमंत्र्यांनी प्रतिनीधीत्व केलेला पश्चिम गेला काॅंग्रेसच्या ताब्यात, विकास ठाकरे विजयी

भाजपचे आमदार आणि राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले सुधाकर देशमुख यांचा धक्‍कादायक पराभव झाला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना 5800 मतांनी पराभूत केले.
मुख्यमंत्र्यांनी प्रतिनीधीत्व केलेला पश्चिम गेला काॅंग्रेसच्या ताब्यात, विकास ठाकरे विजयी

नागपूर : भाजपचे आमदार आणि राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेले सुधाकर देशमुख यांचा धक्‍कादायक पराभव झाला. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना 5800 मतांनी पराभूत केले.

कॉंग्रेसच्या विकास ठाकरे यांच्यासाठी अस्तिवाची लढाई मानल्या जाणाऱ्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. सातत्याने निवडूण येत असल्याने पश्‍चिम नागपूर आता भाजपचा बालेकिल्ला झाला होता.

विभाजित होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांना त्यांनी पराभूत केले होते. देशमुख यांना पराभूत करण्यासाठी त्यावेळी कॉंग्रसेच्या अनेक नेत्यांनी हातभार लावला होता. देशमुख यांना सोनिया गांधी यांनी निवडूण आल्यास मुख्यमंत्री करण्याचे आशवान दिले होते. त्यामुळे अनेक नेते धास्तावले होते. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक नेत्यांनी देशमुखांना पराभूत करण्यासाठी रसद पुरविली होती.

पराभवानंतर रणजित देशमुख यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा येथूनच खऱ्या अर्थाने राज्याच्या राजकारणात उदय झाला. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि मुख्यमंत्रीसुद्धा झाले. या दरम्यान पश्‍चिम मतदारसंघाचे विभाजन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने तयार झालेला दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ निवडला. आता पश्‍चिम नागपूर मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com