विकास ठाकरेंनी कारवाईचे आश्वासन मिळवले, पण ती महिला तक्रार देणार कां?

नीलिमा खंडाते या आपल्या बहिणीसोबत पतीने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी रात्री बारा वाजता सदर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. मात्र पोलिस निरीक्षक अजय बनसोडे यांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठवले होते.
vikas thakare raise issue of police negligence 
vikas thakare raise issue of police negligence 

नागपूर : महिलेची मारहाणीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाची सविस्तर तक्रार दिल्यास त्याला तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. 

आमदार विकास ठाकरे यांनी संबंधित पीआयचा हलगर्जीपणा तसेच मारहाणीची तक्रार करण्यास आलेल्या महिलेला परत पाठवल्याने संबंधित पोलिस निरीक्षकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत केली होती. राज्यात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारावरच्या लक्षवेधी सूचनेवर पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी सदर पोलीस ठाण्यातील प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. गृहमंत्र्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली.

नीलिमा खंडाते या आपल्या बहिणीसोबत पतीने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी रात्री बारा वाजता सदर पोलिस ठाण्यात आल्या होत्या. मात्र पोलिस निरीक्षक अजय बनसोडे यांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठवले होते. दुसऱ्या दिवशी त्या महिलेला पतीने पुन्हा मारहाण केली. बहीण भांडण सोडवण्यास गेली असता तिलाही मारहण केली. त्यात तिचा हात मोडला. हाताला प्लास्टर लाऊन तक्रार दाखल करण्यास गेल्यावर दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसच असे वागत असतील महिलांवरील अत्याचार कसे कमी होणार, असा प्रश्‍न ठाकरे यांनी उपस्थित केला. वेळीच तक्रार दाखल केली असती तर महिलेला पुन्हा मारहाण झाली नसती तसेच तिच्या बहिणीचा हातही मोडला नसता असेही ठाकरे म्हणाले. याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ दखल घेतली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. यापुढे महिलांना सीसीटीएनसी ऍक्‍ट अंतर्गत ऑनलाईन तक्रार करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. आणि यापुढे असे प्रकार घडणार नाही, अशी घोषणा गृहमंत्री देशमुख यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com